पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीटर गोल्लापल्ली या व्यक्तीने स्वत:च्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. पीटर एका खासगी कंपनीत काम करत होता. त्याने रविवारी आत्महत्या केली. ही घटना चामुंडेश्वरी नगर परिसरात घडली.
इस्थर अनुह्या बलात्कार, हत्या प्रकरण घटनाक्रम: फाशीची शिक्षा झालेल्या आरोपीची...
आपल्या चिठ्ठीत पीटरने वडिलांना उद्देशून लिहिले की, डॅडी मला माफ करा. तसेच त्याने पत्नीवर आरोप करत म्हटले, माझी पत्नी पिंकी मला मारते. तिची इच्छा आहे की माझा मृत्यू व्हावा. मी माझ्या पत्नीच्या छळामुळे मरणार आहे.
advertisement
पीटर आणि पिंकी यांचा दोन वर्षांपूर्वी विवाह झाला होता. मात्र वारंवार होणाऱ्या भांडणांमुळे लग्नाच्या तीन महिन्यांनंतर ते वेगळे राहायला लागले. पीटरच्या पत्नीने घटस्फोटासाठी अर्ज दाखल करून 20 लाख रुपयांची पोटगी मागतली होती.
असे पॉयझन दिले की, डॉक्टरांना काही कळायच्या आधीच प्रियकराचा मृत्यू झाला
कुटुंबीयांनी सांगितले की, मागील तीन महिन्यांपासून पीटर आणि त्याच्या पत्नीमध्ये मतभेद सुरू होते. पीटरचा भाऊ म्हणाला की, आम्ही सर्वजण रविवारी चर्चमध्ये गेलो होतो. दुपारी परत आल्यावर पीटर गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला.
माझा भाऊ एका खासगी कंपनीत काम करत होता. मात्र तीन महिन्यांपूर्वी त्याची नोकरी गेली. आम्हाला माझ्या भावासाठी न्याय हवा आहे. त्या महिलेला (पीटरची पत्नी पिंकी) अटक केली पाहिजे. कोणालाही माझ्या भावाने भोगलेल्या यातना भोगायला लागू नयेत. पिंकीच्या मोठ्या भावानेही त्याला मारहाण केली होती. याबाबत आम्ही पोलिसात तक्रात देखील दिली होती.
पीटरच्या भावाच्या तक्रारीवरून पत्नीविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 108 (आत्महत्येस प्रवृत्त करणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.