इंडिया आघाडीच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी बिहारचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव दिल्लीला गेले आहेत. दिल्लीला जाण्याआधी ते म्हणाले की, राष्ट्रीय जनता दलाला सर्वाधिक मते मिळाली. मतांची टक्केवारीही सर्वात जास्त आमची आहे. जागाही वाढल्या आहेत. मतदानाचा परिणाम भाजप बहुमतापासून दूर राहिले. भाजपकडे स्वत:चे बहुमत नाही. भाजपला आता अवलंबून रहावं लागणार आहे. बिहार किंगमेकर म्हणून पुढे येत आहे.
advertisement
लोकसभेत आगळावेगळा विक्रम! एकाच जिल्ह्यातून 7 खासदार, यात एका कुटुंबातलेच पाच जण
नितीश कुमार आणि तेजस्वी यादव सकाळी पावणे अकराच्या सुमारास पटनाहून दिल्लीला निघाले. नितीश कुमार हे एनडीएच्या बैठकीत सहभागी होणार आहेत. तर तेजस्वी यादव इंडिया आघाडीच्या बैठकीत सहभागी होतील. लोकसभा निवडणुकीचे निकाल समोर आल्यानंतर देशासह बिहारच्या राजकारणात बऱ्याच घडामोडी घडत आहेत. निवडणुकीचे निकाल समोर आल्यानंतर नितीश कुमार यांच्या नावाची चर्चा जास्त होत आहे. एनडीए आणि इंडिया आघाडीची दिल्लीत बैठक होत आहे. नितीश कुमार आणि विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव दिल्लीला रवाना झाले. निवडणूक निकालानंतर पहिल्यांदाच दोघे एकत्र दिसले.