संसदेच्या पावसाळी अधिवेशनात अमित शाह यांनी ऑपरेशन महादेव यशस्वी झाल्याची माहिती दिली. तीन दहशतवाद्यांचा खात्मा झाला, त्यात एक लष्कर ए तोएबाचा कमांडर होता.
नवी दिल्ली: संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मोठी माहिती दिली. ऑपरेशन महादेव यशस्वीरित्या पार पडलं. या ऑपरेशन दरम्यान तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. त्यामध्ये एक लष्कर ए तोएबाचा कमांड होता. पहलगाम हल्ल्यातील तिन्ही दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आल्याची माहिती अमित शाह यांनी दिली. जम्मू काश्मीर पोलीस आणि जवानांनी मिळून हे ऑपरेशन केल्याची माहिती त्यांनी संसदेत दिली. अमित शाह ऑपरेशन सिंदूरची माहिती देत असताना विरोधकांनी गोंधळ सुरू केला.