सीएनएन-न्यूज१८ च्या रायझिंग इंडिया समिट कार्यक्रमात नितीन गडकरींनी हजेरी लावली होती. यावेळी गडकरी म्हणाले की, 'वांद्रे-वरळी सी लिंकवर वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल त्यांना दोनदा ५०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. “मी तो भरला आहे,” प्रत्यक्षात नियम सर्वांना लागू होतात. दररोज १०० किमी महामार्ग बांधण्याचे त्यांचे स्वप्न असल्याचेही त्यांनी सांगितलं.
नितीन गडकरी यांनीही रस्ते अपघातांवर आपलं मत व्यक्त केलं. अपघात रोखण्यासाठी मानवी वर्तनात बदल करणे सर्वात महत्त्वाचे आहे. रस्ते अपघातातील बहुतेक मृत्यू हेल्मेट न घातल्यामुळे होतात' असं गडकरी म्हणाले. 'रस्ते सुरक्षा वाढवण्यासाठी दुचाकी उत्पादक कंपन्या वाहन खरेदीच्या वेळी त्यांच्या ग्राहकांना हेल्मेट देखील देतील हे शक्य आहे का? या प्रश्नाच्या उत्तरावर त्यांनी सांगितलं की, ते याबद्दल जाणून घेतील.
advertisement
'पेट्रोल आणि डिझेलशिवाय इतर कोणतीही गाडी खरेदी करा.फ्लेक्स इंजिन, इलेक्ट्रिक आणि हायड्रोजन कार हे भविष्य आहे आणि त्यांनी स्वतः हायड्रोजन कार खरेदी केली आहे, असंही गडकरींनी सांगितलं.
'जे कंत्राटदार त्यांचे काम योग्यरित्या करत नाहीत त्यांच्याशी ते कठोरपणे वागतो. जे कंत्राटदार त्यांचे काम योग्यरित्या करत नाहीत. हल्ली स्पीड ब्रेकरमुळे स्लिप डिस्कची समस्या उद्भवू शकते आणि वेग तपासण्यासाठी एक नवीन रंग कोड येत आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.