तपास यंत्रणांकडून अटकेत असलेल्या सगळ्यांचीच चौकशी केली जात आहे. या कथित हेरांचा पहलगाम हल्ल्याशी काही संबंध आहे का? त्यांचा आका कोण आहे? ते कशासाठी हेरगिरी करत होते? हे गूढ उकलण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, तपास यंत्रणांना पाकिस्तानी आयएसआय हँडलर इक्बाल काना आणि अटक केलेल्या नोमान यांच्यातील चॅट्स आणि व्हॉइस कॉल्सची माहिती मिळाली आहे.
advertisement
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारताकडून पाकिस्तान आणि त्याच्या दहशतवाद्यांवर ऑपरेशन सिंदूर सुरू होते. त्यावेळी भारतातील गुप्तहेर नोमान इलाही आणि आयएसआय हँडलर इक्बाल काना यांच्यात ही चर्चा झाली. या सर्व संभाषणे त्या दरम्यानच्या वेळेत झाली. पानिपतचा गुप्तहेर नोमान इलाही पाकिस्तानला गुप्तचर माहिती देत होता का? याचीही चौकशी सुरू झाली आहे.
ISI हँडलर इक्बाल काना आणि नोमान यांच्यात काय बोलणं झालं?
नोमन: साहेब, मला माफ करा. माझा काय दोष? तू माझ्यासाठी बसला आहेस.
ISI हँडलर इक्बाल: तू माझं काम करशील, आता कधी करणार? मला दोन आर्मी प्रिंट दे
नोमान: फक्त दोन दिवस साहेब
ISI हँडलर इक्बाल: काश्मीरला जा आणि केंटचा फोटो घेऊन ये.
नोमान: हो साहेब.
इक्बाल: Good...Good
'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान झालं बोलणं...
हे संभाषण आयएसआय हँडलर इक्बाल काना आणि नोमाम यांच्यातील आहे जे चॅटवर झाले होते. एक व्हॉइस चॅट देखील समोर आला आहे. यामध्ये इक्बाल आणि नोमान यांच्यातील संभाषण आहे. व्हॉइस चॅटनुसार, इक्बाल म्हणत आहे की जालंधर आणि अमृतसर मार्गे जम्मू आणि काश्मीरकडे येणाऱ्या गाड्यांचे लोकेशन पाठवा आणि त्यात किती लोक येत आहेत ते पहा.
नोमनने व्हॉइस चॅट डिलीट केले
यानंतर, इक्बालला उत्तर दिल्यानंतर, पाकिस्तानचा हेर नोमानने त्याचे व्हॉइस चॅट्स डिलीट केले. गुप्तहेर नोमानकडून एकूण 6 पासपोर्ट जप्त करण्यात आले आहेत. हे सर्व भारतीय पासपोर्ट आहेत. या पासपोर्टमध्ये पाकिस्तानमध्ये गेल्याची एन्ट्री आहे. नोमानजवळून तपास यंत्रणांना काही महत्त्वाची कागदपत्रे मिळाली आहेत.
पाकिस्तानसाठी हेरगिरी, कोणाला झालीय अटक?
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपात आतापर्यंत 7 जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये ज्योती मल्होत्रा, देवेंद्र सिंह ढिल्लन, नोमान, अरमान, तारीफ, गजाला, यामिन अशी अटकेतील लोकांची नावे आहेत. आणखी काहीजणांना अटक होण्याची शक्यता आहे.