TRENDING:

PM Modi Air India Plane Crash : PM मोदी अहमदाबादमध्ये दाखल अपघात स्थळाची केली पाहणी, जखमीची विचारपूस

Last Updated:

PM Modi Ahmedabad Visit : आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी या अपघातात बचावलेल्या एका प्रवाशाची विचारपूस केली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अहमदाबाद : गुरुवारी दुपारी अहमदाबाद विमानतळाजवळ एअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात झाला. या अपघातात प्रवासी, केबिन क्रू आणि मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलमधील डॉक्टरांचा मृत्यू झाला. जवळपास 265 जणांचा यात मृत्यू झाला. तर, एक जण बचावला आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी या अपघातात बचावलेल्या एका प्रवाशाची विचारपूस केली.
News18
News18
advertisement

एअर इंडियाच्या विमान अपघातानंतर देशभरात हळहळ व्यक्त करण्यात आली. देशभरात शोक व्यक्त करण्यात आला. या अपघाताने सगळा देश हादरला. आज पंतप्रधान मोदी हे अहमदाबादच्या दौऱ्यावर आले. पंतप्रधान मोदी यांनी अहमदाबादला उतरताच घटनास्थळाची पाहणी केली.

एआय-171 विमानात 230 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर्स होते, ज्यात 169 भारतीय, 53 ब्रिटीश, 7 पोर्तुगीज आणि एक कॅनेडियन नागरिकांचा समावेश होता. एअर इंडियाने या अपघातात 241 जणांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. तर 11-A सीटवर बसलेले 38 वर्षीय ब्रिटिश नागरिक रमेश विश्वकुमार बचावले. तर, एअर इंडियाचे विमान ज्या इमारतीवर कोसळले, ती इमारत मेडिकल कॉलेजची इमारत होती. विमान कोसळले तेव्हा मेसमध्ये डॉक्टर जेवण करत होते. काही डॉक्टरचा समावेश आहे.

advertisement

advertisement

पंतप्रधान मोदींनी केली जखमीची विचारपूस...

पंतप्रधान मोदी यांनी विमान अपघात घटना स्थळाची पाहणी केल्यानंतर सिव्हील हॉस्पिटलमध्ये जात जखमीची विचारपूस केली. पंतप्रधान मोदी यांनी जवळपास 10 मिनिटे जखमी रमेश विश्वकुमार यांच्याशी संवाद साधला. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि राज्याचे गृहमंत्री हर्ष संघवी हे देखील उपस्थित होते. जखमींसोबत वेळ घालवल्यानंतर आणि चालू उपचारांचा आढावा घेतल्यानंतर पंतप्रधान रुग्णालयाबाहेर पडले.

advertisement

अपघाताचा तपास सुरू

advertisement

DGCA आणि एअर इंडिया प्रशासनाकडून या अपघाताचा सखोल तपास सुरू असून, फ्यूल सिस्टीम, इंजिन लॉग्स आणि फ्लाइट डेटा रेकॉर्डरच्या मदतीने खरी कारणं शोधली जात आहेत.

दरम्यान, अपघातग्रस्त विमानाचा एक ब्लॅक बॉक्स सापडला आहे. दुसर्‍या ब्लॅक ब़ॉक्सचा शोध घेतला आहे. ब्लॅक बॉक्समुळे अपघाताचं नेमकं कारण समोर येण्याची शक्यता आहे.

मराठी बातम्या/देश/
PM Modi Air India Plane Crash : PM मोदी अहमदाबादमध्ये दाखल अपघात स्थळाची केली पाहणी, जखमीची विचारपूस
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल