मेघालय पोलीस राजा रघुवंशी हत्याकांडात अटक केलेल्या चार प्रमुख आरोपींना ज्यात सोनम, राज, आनंद, आकाश आणि विशाल उर्फ विक्की यांचा समावेश आहे. त्यांना घेऊन इंदूर विमानतळावर पोहोचले होते. यावेळी विमानतळावर उपस्थित काही प्रवाशांनी आरोपींना पाहताच संताप व्यक्त केला. याचवेळी एका प्रवाशाने मुख्य आरोपी राजला थेट थप्पड मारली.
या घटनेमुळे विमानतळावर काही काळ तणाव निर्माण झाला होता. शिलाँग पोलीस मोठ्या बंदोबस्तात या सर्व आरोपींना घेऊन आले होते. हत्येसारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपींना समोर पाहिल्याने प्रवाशांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली.
advertisement
सोनम, राज, आनंद, आकाश आणि विशाल उर्फ विक्की या सर्व आरोपींची आता शिलाँग पोलीस कसून चौकशी करणार आहेत. या चौकशीतून अनेक मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मेघालय पोलिसांना आता या आरोपींना शिलाँगला नेऊन अधिक सखोल तपास करायचा आहे.