270 कोटींचा जीएसटी आणि अन्य कर भरले
चंपत राय यांच्या मते, 400 कोटींपैकी 270 कोटी रुपये केवळ जीएसटी (माल आणि सेवा कर) म्हणून भरले गेले आहेत. तर उर्वरित 130 कोटी रुपये विविध करांमध्ये जमा झाले आहेत. यावरून राम मंदिराशी संबंधित धार्मिक पर्यटन आणि विकास प्रकल्पांमधून होणाऱ्या आर्थिक उलाढालींचे महत्त्व स्पष्ट होते.
advertisement
10 पट वाढले भाविक
राम मंदिर उभारल्यानंतर अयोध्या धार्मिक पर्यटनाचे प्रमुख केंद्र बनले आहे. भाविक आणि पर्यटकांची संख्या तब्बल 10 पट वाढली असून त्यामुळे स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. मंदिरे, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, प्रवासी सेवा आणि स्थानिक दुकानदार यांना याचा मोठा फायदा झाला आहे.
1.26 कोटी भाविकांचे दर्शन
चंपत राय यांनी दिलेल्या माहितीनुसार, अयोध्येतील महाकुंभ सोहळ्यादरम्यान तब्बल 1.26 कोटी भाविकांनी रामलल्लाचे दर्शन घेतले होते. एवढ्या मोठ्या संख्येने येणाऱ्या पर्यटकांमुळे अयोध्या उत्तर भारतातील सर्वात मोठ्या धार्मिक स्थळांपैकी एक म्हणून उदयास आले आहे.
राम मंदिर ट्रस्टच्या आर्थिक व्यवहारांवर CAG ची नजर
श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या आर्थिक व्यवहारांचे नियमितपणे भारत सरकारच्या नियंत्रक आणि महालेखापरीक्षक (CAG) यांच्याकडून ऑडिट केले जाते. त्यामुळे ट्रस्टचे आर्थिक व्यवस्थापन पारदर्शक आणि नियमबद्ध पद्धतीने पार पडते, असे चंपत राय यांनी स्पष्ट केले.
अयोध्येतील वाढलेली आर्थिक उलाढाल, सरकारला मिळणारा महसूल आणि धार्मिक पर्यटनामुळे निर्माण झालेल्या नव्या संधी यामुळे अयोध्या भविष्यात भारताच्या धार्मिक पर्यटनाच्या नकाशावर सर्वात मोठ्या केंद्रांपैकी एक बनणार आहे.