TRENDING:

पै-पै साठवले 40,000, शेतकऱ्याने स्कूटीसाठी पोतं भरुन आणली नाणी, Emotional VIDEO

Last Updated:

जशपूरच्या रामलाल यादव यांनी कुटुंबासह ४० हजार रुपयांची नाणी जमा करून देवनारायण होंडा शोरूममधून मुलीसाठी स्कूटी खरेदी केली, जिद्द आणि मेहनतीचे उदाहरण.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
कुठल्याचं गोष्टीला कमी लेखू नये, हे आज पुन्हा एका बापाने सिद्ध करुन दाखवलं. डोळ्यात एक छोटं स्वप्न पाहिलं आणि ते पूर्ण करण्यासाठी जुगाड केला, मात्र कोणत्याही वाईट मार्गानं नाही तर चांगल्या मार्गानं आणि पोरीची इच्छा पूर्ण केली. इतकंच नाही तर प्रत्येक नाण्याला महत्त्व आहे हे त्यानं आज पुन्हा एकदा दाखवून दिलं. थेंबे थेंबे तळे साचे ही म्हण त्याने सत्यात उतरवून दाखवली. या शेतकरी बापानं पै-पै जोडून तब्बल 40 हजार रुपये जमा केले. जमा केलेल्या नाण्यांचं पोतं घेऊन तो थेट मुलीला घेऊन स्कुटीच्या शो रुममध्ये गेला.
News18
News18
advertisement

जिद्दीनं पूर्ण केलं स्वप्न

काहीवेळा स्वप्नं सत्यात उतरवण्यासाठी फक्त हिंमत, कष्ट आणि प्रामाणिक इच्छाशक्तीची गरज असते. शेतकरी कुटुंबाने केवळ मेहनत आणि जिद्दीच्या बळावर आपले स्वप्न पूर्ण केलं. शेतकरी बापानं पोरीसाठी स्कुटर खरेदी केली तीही चक्क नाणी देऊन. सुरुवातीला इतकी नाणी पाहून घाम फुटला, थोडं विचित्रही वाटलं आणि वेगळा आनंदही शोरुममधील कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर होता. एका शेतकरी बापानं आपला मुलीला इतक्या कष्टानं हे गिफ्ट दिलं.

advertisement

छत्तीसगडच्या जशपूर जिल्ह्यात एका शेतकरी कुटुंबाने आपल्या अपार मेहनत आणि जिद्दीचे एक अद्भुत उदाहरण समोर ठेवलं. मुलाच्या शिक्षणासाठी स्कूटी खरेदी करायची, हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी या कुटुंबाने गेल्या सहा महिन्यांत रोजच्या कमाईतून जमवलेली रक्कम घेऊन ते शोरूममध्ये पोहोचले. विशेष म्हणजे, काही रक्कम ही कॅशमध्ये तर काही रक्कम ही नाण्यांमध्ये होती. एक दोन नाही तर तब्बल 40 हजार रुपयांची 10-20 ची नाणी त्यांनी जमा केली होती.

advertisement

पोत्यातून आणली नाणी

जशपूर जिल्ह्यातील बसंतपूर गावचे रहिवासी असलेले शेतकरी रामलाल यादव हे आपल्या कुटुंबासोबत जिल्हा मुख्यालयातील 'देवनारायण होंडा' शोरूममध्ये नवी स्कूटी खरेदी करण्यासाठी आले होते. त्यांच्यासोबत होती नाण्यांनी भरलेली एक मोठी गोण (बोरी). ४० हजार रुपयांच्या या नाण्यांमध्ये १० आणि २० रुपयांच्या नाण्यांचा मोठा सहभाग होता. रामलाल, त्यांची पत्नी सुनीता, मुलगा अजय आणि मुलगी राणी हे सर्वजण शोरूममध्ये हजर होते. त्यांनी गोणी उघडताच शोरूममधील कर्मचाऱ्यांची एकच धावपळ उडाली. या नाण्यांची मोजदाद करण्यासाठी कर्मचाऱ्यांना अनेक तास लागले.

advertisement

शेतकरी झाला भावुक

आमचं कुटुंब पूर्णपणे शेतीवर अवलंबून आहे. मुलीचं लग्न झाल्यावर आता मुलाला शिक्षणासाठी स्कूटीची गरज होती. गेल्या ६ महिन्यांपासून आम्ही कुटुंबातील प्रत्येकाने मेहनत केली. भाजी विकणे, मजुरी करणे... घरातल्या प्रत्येक सदस्याने यासाठी योगदान दिले. नाणी जमा करत गेलो. अखेर ४० हजार रुपये नाणी आणि बाकीच्या नोटा घेऊन आम्ही स्कूटी घेण्यासाठी इथे आलो.” रामलाल यांना हे बोलताना भरुन आलं होतं. त्यांच्या डोळ्यात स्वप्न पूर्ण होत असल्याची एक चमक आणि भावुक करणारा क्षण अशी द्विधा मनस्थिती निर्माण झाली होती.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
मक्याच्या दरात सुधारणा, सोयाबीनला आज काय मिळाला भाव? VIdeo
सर्व पहा

केसरा गावात राहणारे शेतकरी बजरंग राम भगत यांचे स्वप्न होते की, आपली मुलगी चम्पा भगत हिला एक होंडा ॲक्टिव्हा घेऊन द्यावी. कुटुंबाची मिळकत तशी खूप मर्यादित होती. तरीही, त्यांनी ठरवले की लेकीच्या आनंदापुढे पैशाची कोणतीही अडचण येऊ दिली जाणार नाही. रामलाल यांनी गेल्या सहा महिन्यांपासून दररोजच्या कमाईतून आणि खर्चातून ४०,००० रुपयांची नाणी जमा केली.

मराठी बातम्या/देश/
पै-पै साठवले 40,000, शेतकऱ्याने स्कूटीसाठी पोतं भरुन आणली नाणी, Emotional VIDEO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल