आमिर नजीर वानीचा व्हिडिओ समोर
सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत मारला गेलेला दहशतवादी आमिर नजीर वाणी याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये तो व्हिडिओ कॉलवर आपल्या आईशी बोलताना दिसत आहे. संभाषणादरम्यान त्याची आई त्याला आत्मसमर्पण करण्यास सांगत आहे. ती म्हणते, बेटा सरेंडर कर. मात्र त्यानंतरही त्याने आत्मसमर्पण केले नाही आणि सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत तो मारला गेला.
advertisement
आई म्हणाली...
समोर आलेल्या व्हिडिओमध्ये दहशतवादी आमिर नजीर वानी चकमकीपूर्वी आपल्या आईशी बोलताना दिसत आहे. आमिर नजीर वाणीची आई त्याला आत्मसमर्पण करण्यास सांगत आहे. पण आमिर म्हणतो, फौजेला पुढे येऊ दे, मग बघतो. सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत आमिर मारला गेला.
नादेर त्राल भागात चकमक
पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, दक्षिण काश्मीरमधील अवंतीपुराच्या नादेर त्राल भागात दहशतवाद्यांची उपस्थिती असल्याची अचूक माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी घेराबंदी करून शोध मोहीम सुरू केली. त्यांनी सांगितले की, शोध मोहिमेदरम्यान लपलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला. त्यानंतर चकमक सुरू झाली.
शोपियामध्ये लष्करचे तीन दहशतवादी ठार
अधिकाऱ्याने सांगितले की, प्रत्युत्तरादाखल तीन दहशतवादी मारले गेले. यापूर्वी दोन दिवसांपूर्वी शोपिया जिल्ह्यातील केल्लर भागात सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत लष्कर-ए-तैयबाचे तीन दहशतवादी मारले गेले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परिसरात शोध मोहीम अजूनही सुरू आहे.