कसा घडला अपघात?
सुरेंद्र आपल्या घराजवळील मुसतफा अपार्टमेंटमध्ये राहत होता. खेळता खेळता तो लिफ्टमध्ये अडकला आणि या भयंकर अपघातात त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्य सुरू केले. मात्र, लहानग्याचा जीव वाचवता आला नाही.
अनेक अपघात लिफ्टशी संबंधित
या घटनेमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, याआधीही अशा दुर्दैवी घटना घडल्या आहेत. लिफ्टमध्ये अडकणे किंवा लिफ्टच्या शाफ्टमध्ये पडून मृत्यू होण्याचे प्रकार वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
advertisement
इंस्टाग्राम फ्रेंडकडून क्रूर अत्याचार! ब्लॅकमेल करून 16 महिने केला बलात्कार
याआधीही अशाच घटना घडल्या!
अलीकडेच सीरिसिल्ला शहरातील एका अपार्टमेंटमध्ये ज्येष्ठ पोलीस अधिकारी ठोटा गंगाराम (५९) यांचा लिफ्टच्या शाफ्टमध्ये पडून मृत्यू झाला होता. लिफ्टच्या तांत्रिक बिघाडामुळे ग्रिलचे दरवाजे उघडले, पण लिफ्ट आली नसल्याचे त्यांना समजले नाही. त्यांनी पुढे पाऊल टाकताच ते थेट शाफ्टमध्ये कोसळले आणि गंभीर दुखापतीमुळे त्यांचा मृत्यू झाला.
फेब्रुवारीमधील हृदयद्रावक घटना
फेब्रुवारी महिन्यात देखील अशाच प्रकारची एक घटना घडली होती. एका सहा वर्षीय मुलाचा अपघात लिफ्ट आणि भिंतीच्या मधल्या जागेत अडकल्यामुळे झाला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला.
लिफ्ट सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
या वारंवार होणाऱ्या घटनांमुळे लिफ्टच्या सुरक्षिततेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. लिफ्टच्या तांत्रिक बिघाडामुळे निष्पाप लोकांचे जीव जात आहेत. त्यामुळे लिफ्टच्या देखभालीबाबत अधिक जबाबदारी घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.