वॉर रूममधील तीन सेनाप्रमुख
'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत पाकिस्तानमधील दहशतवादी ठिकाणांवर भारताचे बॉम्ब बरसले असताना वॉर रूममध्ये भारतीय लष्कराचे प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी, भारतीय हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल एपी सिंह आणि भारतीय नौदलाचे प्रमुख ऍडमिरल दिनेश उपस्थित होते. हे तिघेही महत्त्वाच्या क्षणी एकत्र निर्णय घेताना आणि कारवाईचे निरीक्षण करताना दिसले.
advertisement
ऑपरेशन सिंदूरची पार्श्वभूमी
22 एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे निष्पाप लोकांवर भीषण हल्ला केला होता. ज्यात 26 नागरिकांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी लोकांचा धर्म विचारला आणि त्यानंतर त्यांना मारण्यात आले. मृतांमध्ये मोठ्या संख्येने पर्यटक होते. या हृदयद्रावक घटनेनंतर भारतीय लष्कराने 7 मे रोजी दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन सिंदूर' सुरू केले.
बॉर्डरवर राफेल, S-400 तैनात; डोळे वटारले तर जिवंत परतणार नाही, सीमेवर तणाव वाढला
भारताची निर्णायक प्रत्युत्तर कारवाई
लष्कराच्या या प्रत्युत्तर कारवाईत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (PoK) मधील 9 दहशतवादी ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले. यात मसूद अजहरच्या लष्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद आणि हाफिज सईदच्या जमात-उद-दावाच्या दहशतवादी शिबिरांचा समावेश होता.
दरम्यान पाकिस्तानी लष्कराने प्रत्युत्तर म्हणून भारतावर ड्रोन आणि क्षेपणास्त्रे डागली परंतु भारतीय हवाई संरक्षण प्रणाली जसे की आकाशतीर आणि एस-४०० ने, त्यांना हवेतच नष्ट केले. यानंतर भारताने कठोर पलटवार करत पाकिस्तानच्या 9 ते 11 हवाई दलाचे तळ उद्ध्वस्त केले. या कठोर लष्करी कारवाईमुळे भयभीत झालेल्या पाकिस्तानी लष्कराने युद्धविरामाची मागणी केली.
पाकिस्तानी DGMO ने भारतीय समकक्षेशी संपर्क साधून तणाव कमी करण्याचा प्रस्ताव ठेवला. ज्यावर दोन्ही देशांनी तात्पुरत्या युद्धविरामावर सहमती दर्शविली. भारताने आपल्या लष्करी कारवाईचे पुरावे आंतरराष्ट्रीय समुदायासमोर सादर केले. ज्यामुळे हे स्पष्ट झाले की भारताची प्रत्युत्तर कारवाई केवळ आत्मसंरक्षण नसून दहशतवादी ठिकाणांना मुळापासून नष्ट करण्याच्या निर्णायक धोरणाचा भाग होता.