ईडीच्या अधिकाऱ्यांनी कोट्यवधी रुपयांच्या राशन वितरण घोटाळा प्रकरणाच्या चौकशीसाठी मलिक यांच्या काही ठिकाणांवर गुरुवारी छापे टाकले. एका अधिकाऱ्याने सांगितलं की, ईडीच्या अधिकाऱ्यांनी कोलकात्यातील साल्ट लेक भागात वनमंत्री मलिक यांच्या दोन फ्लॅटवर छापा टाकला. तर ईडीच्या छाप्याबाबत बोलताना तृणमूल काँग्रेसने हे बदल्याचं राजकारण असून यापेक्षा काही वेगळं नाही असं म्हटलंय.
राष्ट्रवादी, काँग्रेस नेत्यांच्या कारखान्याला कर्जासाठी राज्य सरकार राहणार हमी
advertisement
अधिकाऱ्यांनी सांगितले की, मलिक यांच्या माजी स्वीय सहायकाच्या घरासह इतर ८ ठिकाणी छापा टाकला गेला. केंद्रीय तपास यंत्रणेनं याआधी एका व्यक्तीला अटक केली आहे. त्याचे तृणमूल काँग्रेस, मलिक यांच्याशी जवळचे संबंध आहेत. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीशी संबंधाबाबत मलिक यांची चौकशी केली जात आहे. याशिवाय त्यांच्या बँक खात्यांचाही तपास सुरू आहे.