विमानतळ परिसरातील एका व्यक्तीने त्याच्या पत्नीवर गंभीर आरोप केले आहेत. बाबू मुराई कॉलनीमध्ये राहणाऱ्या प्रेम नारायण अथियान नावाच्या या व्यक्तीने पोलिसांची मदत मागितली आहे. प्रेम नारायण याने त्याची पत्नी त्याला जीवे मारण्याची धमकी देत असल्याचे म्हटले आहे. ज्या प्रकारे मुस्कानने तिच्या पतीला आणि सोनमने राजा रघुवंशीला संपवलं, तसेच मला संपवण्याची धमकी दिल्याचे सांगण्यात आले.. प्रेम नारायण हा इंदूर विमानतळावर मशीन ऑपरेटर आहे.
advertisement
प्रेम नारायण अथियान हा दमोहचा रहिवासी आहे. त्याने गुरुवारी आपल्या पोलिस नियंत्रण कक्षात पोहोचून तक्रार दाखल केली. त्याने सांगितले की त्याचे मानसी चररशी 5 जून 2023 रोजी प्रेमविवाह झाला होता. लग्नानंतर दोघांनीही आर्य समाज मंदिरात विधीनुसार लग्न केले. प्रेम नारायणच्या मते, सुरुवातीला सर्व काही ठीक होते, परंतु गेल्या एक वर्षापासून परिस्थिती बदलू लागली.
पत्नीने एअर होस्टेस होण्यासाठी घेतला प्रवेश...
प्रेम नारायण याने सांगितले की, जेव्हा त्याची पत्नी इंदूरला आली आणि एअर होस्टेस होण्यासाठी अभ्यास सुरू केला. त्यावेळी त्याने तिच्या अभ्यासासाठी दीड लाख रुपयांचे कर्ज घेतले. या दरम्यानच्या काळात त्याच्या पत्नीचे आणि एका युवकाचे प्रेम प्रकरण सुरू झाले. दोघांच्या प्रेम प्रकरणाची सुरुवात शहरातील बस प्रवासातून झाल्याचे त्याने सांगितले. त्याची पत्नी आणि तिचा प्रियकर दीपक हरियाले यांची बस प्रवासात जवळीक वाढली. त्यानंतर या दोघांमध्ये हॉटेलमध्ये अनेक वेळा शारीरिक संबंधही झाले असल्याचा आरोप नारायणने केला.
तुझे हाल राजा रघुवंशीसारखे होतील...
प्रेम नारायणने सांगितले की, त्याने पत्नीचे कॉल डिटेल्स काढले तेव्हा त्यांना सर्व काही कळले. त्यानंतर त्यांच्या पत्नीने त्यांना धमकी दिली की जर तो या प्रेम प्रकरणाच्या आड आला तर त्याचे हाल हे राजा रघुवंशी सारखे होतील. प्रेम नारायण याने आपल्याला पत्नीची भीती वाटत असून माझे ऐकणारे कोणी नसल्याचे म्हटले. माझ्या पत्नीला तिच्या प्रियकरासोबत राहायचे असेल तर तिने स्वेच्छेने जावे, पण मला माफ करा, मला जिवंत सोडा, असे आर्जव त्याने केले आहे.
पोलिसांमध्ये तक्रार दाखल...
पत्नी आपल्या जीवाला धोका असल्याचे प्रेम नारायण याने म्हटले. त्याने पोलिसांकडे संरक्षणाची विनंती केली आहे. पोलिसांनी प्रेम नारायणची तक्रार नोंदवून घेतली आहे आणि प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलिसांनी सांगितले की ते प्रेम नारायणची पत्नी आणि दीपक हरयाळे यांचीही चौकशी करतील.