लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर एनडीए आघाडीची बैठक दिल्लीमध्ये पार पडली. यावेळी एनडीएचे एनडीएचे सगळेच नेते उपस्थितीत होते. त्यामुळे सगळं काही सुरळीत आहे, असं मेसेज देण्यात आला. पण आता नितीशकुमार यांनी आपल्याला नेमकं काय हवंय याची मागणी केली आहे.
नितीश कुमारांना हवी तीन मंत्रिपदं?
नितीश कुमारांना रेल्वे, कृषी आणि अर्थ खातं ही 3 मंत्रालयं हवी आहेत. ज्यात रेल्वे मंत्रालय हे नितीश कुमार यांना प्राधान्याने हवं आहे, अशी सूत्रांनी माहिती दिली आहे. पक्षाला रेल्वेची गरज आहे कारण नितीश कुमार याआधी रेल्वेमंत्री होते. रेल्वे मंत्रालय हा एक असा विभाग आहे जो जनतेशी संबंधित आहे. या मंत्रालयाशी अधिकाधिक लोक जोडले जाऊ शकतात.
advertisement
अग्निवीर योजना बदला?
किंगमेकर ठरलेल्या जेडीयू कडून नव्याने तयार होणाऱ्या केंद्र सरकारकडे मागण्या वाढतच चाललं आहे. अग्निवीर योजनेचा पुनर्विचार करा अशी मागणीही जेडीयूने केली आहे. अग्निवीर योजनेचा पुनर्विचार केला जावा यासाठी नितीश कुमार आग्रही असल्याचं कळतंय, लष्करी दलात चार वर्ष कंत्राटी पद्धतीने सेवेत घेण्याबाबत अग्निवीर योजना आहे. अग्नीविर योजनेविरोधात बिहार आणि उत्तर प्रदेशात प्रचंड असंतोष होता. पण भाजपने हा मुद्दा पुढे नेला आता नितीशकुमार यांनी महत्त्वाची मागणी केली आहे.
चंद्रबाबू नायडू यांना काय हवंय?
चंद्रबाबू नायडू यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची मागणी केली आहे. त्याशिवाय आंध्र प्रदेशसाठी स्पेशल पॅकेजची मागणी केली आहे. या मागण्यावर दोन्ही नेते ठाम आहे. अजूनही मागण्याची यादी गुलदस्त्यात आहे. नितीश कुमार यांच्या जेडीयूला 12 जागा मिळाल्या आहेत. तर चंद्राबाबू नायडू यांना 16 जागा मिळाल्या आहेत. फॉर्म्युल्यानुसार दोन्ही नेत्यांना 5 मंत्रिपदं दिली जाऊ शकतात, अशी माहितीही समोर आली आहे. नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांना पाच मंत्रिपदे दिली जाण्याची शक्यता आहे. सरकारमध्ये पाच खासदारांमागे एक कॅबिनेट मंत्रीपद असा फॉर्म्युला असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
दरम्यान, नितीश कुमार आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या निवासस्थानी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक सुरू आहे.. बैठकीला गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उपस्थित आहेत. मित्रपक्षांशी चर्चेसाठी स्थापन करण्यात आलेल्या भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या समितीत हे दोन्ही नेते आहेत. मित्रपक्षांशी चर्चेचा अजेंडा काय असावा, त्यांना कोणत्या प्रमाणात मंत्रिमंडळात स्थान द्यायचे, अपक्ष खासदारांना कसे स्थान द्यायचे, यावर महत्त्वपूर्ण चर्चा सुरू आहे.