मिळालेल्या माहितीनुसार ज्योती मल्होत्राने 2023 मध्ये व्हिसा मिळवण्यासाठी एजंटची मदत घेतली आणि पाकिस्तानला भेट दिली होती. याच भेटीदरम्यान तिची ओळख नवी दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयातील कर्मचारी एहसान-उर-रहीम उर्फ दानिश याच्याशी झाली. दानिशला 13 मे 2025 रोजी Persona Non Grata घोषित करून भारतातून हद्दपार करण्यात आले आहे.
गद्दार इन्फ्लुएंसर! यूट्यूबर ज्योती निघाली देशद्रोही; पाकिस्तानसाठी केली हेरगिरी
advertisement
तपासात असे समोर आले आहे की दानिशने ज्योतीची अनेक पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्यांशी (Pakistan Intel Operatives - PIO) ओळख करून दिली होती. ज्योतीवर भारतीय ठिकाणांविषयी संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवल्याचा आणि सोशल मीडियावर पाकिस्तानची सकारात्मक प्रतिमा निर्माण केल्याचा आरोप आहे. तपास अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की ज्योतीचे एका पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्याशी जवळीचे संबंध होते आणि तिने त्याच्यासोबत इंडोनेशियातील बालीलाही प्रवास केला होता.
पाहलगममध्ये झालेल्या भीषण हत्याकांडानंतर भारताने 'ऑपरेशन सिंदूर' सुरू केले, तेव्हा ज्योती तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर 'युद्धाला नाही' (say no to war) असे संदेश पोस्ट करत होती. तिच्या अटकेमुळे अशा इतर भारतीय Influencers आणि यूट्युबर्सची चौकशी करण्याची शक्यता वाढली आहे. जे पाकिस्तानचे समर्थन करत होते. विशेषतः ज्यांनी पाहलगम ते ऑपरेशन सिंदूर दरम्यान 'युद्धाला नाही' किंवा 'सर्व धर्म वडा पाव' सारख्या भूमिकांचे समर्थन केले, ते आता तपास यंत्रणांच्या रडारवर येऊ शकतात.
फक्त 6 मिनिटात टर्की उद्ध्वस्त होईल, भारताकडे आहे ब्रह्मोस पेक्षा भयानक Missile!
ज्योती मल्होत्राच्या अटकेमुळे सोशल मीडियावरील देशभक्ती आणि विश्वासार्हतेच्या मुद्द्यांवर गंभीर चर्चा सुरू झाली आहे. सुरक्षा यंत्रणा आता सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर अधिक लक्ष ठेवण्याची शक्यता आहे. जेणेकरून भविष्यात अशा घटना टाळता येतील. या घटनेमुळे सामान्य नागरिकांमध्येही सोशल मीडियावरील माहिती आणि प्रभावकांबद्दल अधिक सतर्कता बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे.