रफ्तारने त्याच्या अधिकृत सोशल मिडिया अकाऊंटवर त्याच्या लग्नाचे कोणतेही फोटो शेअर केलेले नाही. अशा परिस्थितीत त्याच्या लग्नाच्या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. चाहते त्याला लग्नाच्या शुभेच्छा देत आहेत. चाहत्यांना हे जाणून घ्यायचं आहे की रफ्तारने खरोखरच दुसऱ्यांदा लग्न केलं आहे का? हे फोटो वेगाने व्हायरल झाले आहेत.
रॅपर रफ्तारने फॅशन स्टायलिस्ट मनराज जवंदासोबत लग्न केलं आहे. दरम्यान, या दोघांनीही लग्नाचे कोणतेही फोटो शेअर केले नाहीत. मात्र समोर आलेल्या फोटोंमध्ये दोघेही खूपच आनंदी दिसत आहेत. रफ्तारच्या लग्नाच्या फोटोंनी सोशल मीडियावर खळबळ उडवली आहे. याआधी त्यांच्या लग्नाची पत्रिकाही सोशल मीडियावर व्हायरल झाली होती, ज्यात रफ्तार आणि मनराजचे नाव लिहिले होते.
रॅपर रफ्तारचं खरं नाव दिलिन नायर आहे. त्याने ३१ जानेवारी २०२५ ला कुटुंबिय आणि जवळच्या मित्रपरिवाराच्या साक्षीने लहान समारंभात दाक्षिणात्य पद्धतीने लग्न केलं आहे. तो आणि त्याची पत्नी सोनेरी रंगाच्या पारंपारिक पेहरावात दिसत आहेत. फोटोमध्ये रफ्तार मनराजला मंगळसूत्र घालताना आणि तिच्याकडे प्रेमाने बघताना दिसत आहे. दोघेही यावेळी खूपच आनंदी दिसत आहेत.
काही रिपोर्ट्समध्ये दिलेल्या माहितीनुसार रफ्तार आणि मनराज २०२३ पासून एकमेकांना डेट करत आहेत. जवळपास दोन वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी आज ३१ जानेवारी २०२५ ला लग्न केले आहे.
