TRENDING:

Maharashtra Elections 2024 : जागा वाटपात वादावादी, ठाकरेंसोबत चर्चा, बाळासाहेब थोरात म्हणतात, ''आता....''

Last Updated:

Maharashtra Assembly Elections : काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी आज मातोश्रीवर शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा केली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई :  राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतरही महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाच्या मुद्यावरुन तिढा कायम आहे. काँग्रेस आणि ठाकरे गटात काही जागांवरून सुरू असलेला तिढा अजूनही सुटला नाही. अशातच आज काँग्रेसचे विधीमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात यांनी आज मातोश्रीवर शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा केली.
जागा वाटपात वादावादी, ठाकरेंसोबत चर्चा, बाळासाहेब थोरात म्हणतात, ''आता....''
जागा वाटपात वादावादी, ठाकरेंसोबत चर्चा, बाळासाहेब थोरात म्हणतात, ''आता....''
advertisement

मविआतील जागा वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी मविआतील घटक पक्षांच्या हालचाली सुरू आहेत. काँग्रेसने ठाकरे गटासोबत सुरू असलेला वाद संपवण्यासाठी बाळासाहेब थोरात यांच्यावर काँग्रेस हायकमांडने चर्चेची जबाबदारी सोपवली. त्यानुसार, आज बाळासाहेब थोरात यांनी सकाली सिल्वर ओकवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा केली. पवारांसोबत चर्चा केल्यानंतर थोरात यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा केली.

advertisement

ठाकरेंसोबतच्या चर्चेनंतर थोरात काय म्हणाले?

उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर बाळासाहेब थोरात यांनी सांगितले की, काँग्रेसचा प्रतिनिधी म्हणून उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची देखील भेट घेऊन चर्चा केली. थोडे विषय बाकी असून फार अडचण नाही. आघाडीमध्ये प्रत्येकाला वाटतं आपला उमेदवार निवडून येईल. मात्र हा वादाचा विषय नसून महाविकास आघाडीची आज बैठक होईल, असेही त्यांनी सांगितले. आजच्या बैठकीत उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना काय वाटतं हे जाणून घेतले आहे. आता बैठकीत आम्ही मार्ग काढू असेही थोरात यांनी सांगितले.

advertisement

तर, ठाकरे गटाचे खासदार अॅड. अनिल देसाई यांनी सांगितले की, थोड्या शिल्लक राहिलेल्या जागेवर सकारात्मक निर्णय होईल. महाविकास आघाडीचे जागावाटप होईल, यात कोणीही शंका बाळगण्याचे कारण नसल्याचेही त्यांनी सांगितले.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यानं डोकं लावलं, डाळिंबीच्या बागेत पैशाचं पीक, अर्ध्या एकरात 2 लाखांचं...
सर्व पहा

मतदानासाठी आता एक महिन्यापेक्षाही कमी कालावधी असताना मविआतील शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यात वाद सुरू आहे. दोन्ही पक्षांमध्ये 15 जागांवर वाद सुरू आहे. तर, यामध्ये विदर्भ आणि मुंबईतील जागांचा समावेश आहे.

advertisement

मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/Maharashtra Assembly Elections/
Maharashtra Elections 2024 : जागा वाटपात वादावादी, ठाकरेंसोबत चर्चा, बाळासाहेब थोरात म्हणतात, ''आता....''
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल