80 ते 90 च्या नायिका या लग्न करायला घाबरायच्या. कारण त्यांचे लग्न झाले की अभिनयाला ब्रेक लागायचा. सिनेमा मिळायचे बंद व्हायचे. मिळाले तरी लीड भूमिका असणाऱ्या मिळायच्या नाहीत. अगदी असेच सोनी राजदान हिच्यासोबत झाले. तिने महेश भट यांच्या सोबत लग्न केले आणि तिला काम मिळणे बंद झाले.
2 वर्ष निर्मात्यांच्या दारोदार फिरले, कोणी दिला नाही भाव; इंदिरा गांधींमुळे सुपरस्टार बनले असरानी
advertisement
लग्न झाल्यावर काम मिळणं बंद झालं
न्युज 18 सोबत बोलताना सोनी राजदान हिने आत्ताच्या इंडस्ट्रीची आणि तेव्हाच्या काळातील इंडस्ट्रीची तुलना केली आहे. त्यात तिने आपल्या वैयक्तिक आयुष्यातील एक किस्सा सांगितला आहे. ती म्हणाली, "मी इंडस्ट्री मध्येच लहाणाची मोठी झाली आहे, म्हणजे असे की, मी खूप वर्ष इंडस्ट्रीमध्ये काम केले आहे. इतक्या वर्षात खूप मोठे बदल झाले आहेत. मला वाटते ही पूर्ण वेगळी दुनिया आहे. मी जेव्हा सुरुवात केली होती, तेव्हा मी खूप चांगले काम करत होती, पण अचानक माझे लग्न झाले. त्यानंतर मला काही काम मिळाले नाही."
लोकांच्या बोलण्याने कंटाळली होती
लग्नानंतर सोनी राजदानला काम मिळत नव्हते. पण त्याच कठीण काळात एक रमेश सिप्पी आणि ज्योति सरप यांची टीवी सिरीयल मिळाली. त्यापासून तिचे करियर पुन्हा एकदा रुळावर आले. ती म्हणाली, मला कळले की कोणीतरी म्हटले की, ती महेश ची पत्नी आहे मग तिला कामाची काय गरज ? मला तेव्हा खूप राग आला होता. त्यानंतर मला नशिबाने काही चांगले सिनेमे मिळाले. पण त्याअगोदर खूप मानसिक तणाव होता. आजच्या काळात हे सगळे बदलले आहे. आजच्या अभिनेत्री या वैयक्तिक जीवनालाही सहज जगू शकतात.
