जेमिनी 3 ची तर्क करण्यात अचूक
जेमिनी 3 लाँच करताना, गुगलचे सीईओ सुंदर पिचाई म्हणाले की ते कंपनीची मल्टीमॉडल अंडरस्टँडिंग, दीर्घकालीन एनालिसिस विश्लेषण आणि एजंटिक वर्तन एकाच प्रणालीमध्ये एकत्र आणते. ते तर्क करण्यात पारंगत आहे आणि मानवांप्रमाणेच, अर्थाची खोली आणि बारकावे समजू शकते. त्यांनी स्पष्ट केले की, हे मॉडेल तुमच्या विनंतीमागील संदर्भ आणि हेतू समजून घेईल, ज्यामुळे लांबलचक सूचनांची आवश्यकता राहणार नाही.
advertisement
हे जेमिनी 3 ची कॅपेसिटी किती
गुगलने म्हटले आहे की त्यांचे नवीन मॉडेल हाताने लिहिलेल्या नोट्स, दीर्घ रिसर्च पेपर किंवा लांबलचक व्हिडिओ व्याख्याने असोत, विविध प्रकारच्या कंटेंटचे विश्लेषण करु शकते आणि समजू शकते. जेमिनीला यापैकी काहीही समजण्यास कोणतीही अडचण येणार नाही. याचा वापर करून, यूझर घरी लिहिलेल्या रेसिपी डिजिटल स्वरूपात रूपांतरित करू शकतील. विद्यार्थी त्यांच्या सोयीनुसार लांबलचक शैक्षणिक रिसर्च पेपरमधून नोट्स देखील तयार करू शकतील. गुगलने असेही म्हटले आहे की जेमिनी 3 ने एआय मॉडेलची विश्लेषणात्मक खोली मोजणाऱ्या अनेक शैक्षणिक आणि कृत्रिम चाचण्यांमध्ये अपवादात्मकपणे चांगली कामगिरी केली. या मॉडेलने गुगल सर्चच्या एआय मोडला आणखी मजबूत करण्याची अपेक्षा आहे. हे मॉडेल एआय मोडमध्ये डायनॅमिक व्हिज्युअल लेआउट, सिम्युलेशन आणि इंटरॅक्टिव्ह टूल-बेस्ड परिणाम दर्शवेल.
