मुलांच्या आहारात पोषक तत्वांचा समावेश करणे ही पहिली गरज आहे. दूध, फळे, डाळी, हिरव्या भाज्या, तूप आणि सुकेमेवे यांचा आहारात समावेश केल्यास शरीराला आवश्यक व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स मिळतात. हळदीचे दूध, मध-आले यांसारख्या घरगुती उपायांनी मुलांना सर्दी-खोकल्यापासून नैसर्गिक संरक्षण मिळते. तसेच लसूण, तुळस आणि दुधी भोपळ्यासारखी भाजी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यात मदत करते.
advertisement
Pune News : पुणेकरांनो आरोग्याला जपा! शहरात डेंग्यूचे रुग्ण वाढले, धक्कादायक आकडेवारी समोर
स्वच्छता हा मुलांच्या आरोग्याचा महत्त्वाचा घटक आहे. घरातील हवा खेळती ठेवणे, स्वच्छ पाणी पाजणे आणि मुलांना हात धुण्याची सवय लावणे, हे अत्यंत आवश्यक आहे. हातांच्या माध्यमातून जीवाणूंचा संसर्ग होण्याचा धोका अधिक असल्यामुळे लहान वयापासून स्वच्छतेची शिकवण देणं गरजेचं ठरतं. त्याचबरोबर पुरेशी झोप मिळाल्यास मुलांचं शरीर निरोगी राहतं.
सूर्यप्रकाश आणि व्यायाम यांचा मुलांच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो. अंगणात खेळणे किंवा हलकेफुलके व्यायाम करणे यामुळे शरीरात व्हिटॅमिन D तयार होतं आणि हाडं मजबूत होतात. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. तसेच नैसर्गिक वातावरणात वेळ घालवल्याने मुलांच्या मानसिक आरोग्यालाही बळकटी मिळते.
एकूणच घरगुती उपाय हे लहान मुलांना औषधांवरील अवलंबन कमी करून नैसर्गिकरित्या प्रतिकारशक्ती मजबूत करण्याचा उत्तम मार्ग ठरू शकतात. योग्य आहार, स्वच्छता, नियमित झोप आणि योग्य जीवनशैली या चार बाबींवर लक्ष केंद्रित केल्यास मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. पालकांनी हे उपाय मुलांच्या दैनंदिन जीवनात लागू करण्याचा प्रयत्न केल्यास लहान मुलं आजारांपासून सुरक्षित राहून निरोगी आणि तंदुरुस्त आयुष्य जगू शकतात.