ट्रेनवर गोळीबार, 400 प्रवासी संकटात
रेल्वे अधिकाऱ्यांनी रॉयटर्स या वृत्तसंस्थेला सांगितले की, जाफर एक्स्प्रेस या ट्रेनवर अचानक हल्ला करण्यात आला. या ट्रेनमध्ये नऊ बोगी असून, जवळपास 400 प्रवासी प्रवास करत होते. क्वेटाहून पेशावरकडे जात असताना हल्लेखोरांनी रेल्वे रुळ उडवून ट्रेन थांबवली आणि ताबा मिळवला.
बीएलएच्या धमक्या आणि मागण्या
बीएलएच्या प्रवक्त्या जीयंद बलूच यांनी सांगितले की, जर पाकिस्तान सरकार किंवा लष्कराने कोणतीही कारवाई केली, तर सर्व बंधकांना मारण्यात येईल. बीएलए हा गट बलूचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढणारा प्रमुख विद्रोही गट मानला जातो आणि पाकिस्तानी सैन्यासाठी मोठा डोकेदुखी ठरला आहे.
advertisement
BLAने पाकिस्तान लष्कराचा गळाच धरला, दुर्गम डोंगराळ प्रदेशात ट्रेन हायजॅक
बलूच कोण आहेत?
बलूच हा एक जातीय गट असून, तो पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि इराण या देशांमध्ये वसलेला आहे.
पाकिस्तानमधील बलूच समुदाय
बलूचिस्तान हा पाकिस्तानचा सर्वात मोठा प्रांत आहे, पण तो सर्वात गरीब आणि कमी लोकसंख्या असलेला भाग मानला जातो. बलूच लोक स्वतंत्र भाषा (बलोची), वेगळी संस्कृती आणि पारंपरिक आदिवासी जीवनशैली जपतात. पंजाबी, सिंधी आणि पश्तून यांच्यापेक्षा बलूच लोक वेगळ्या ओळखीचे आहेत.
बलूच संघर्षाचे कारण
आर्थिक शोषण: बलूचिस्तान नैसर्गिक संसाधनांनी समृद्ध असतानाही, स्थानिक लोकांना त्याचा लाभ मिळत नाही.
राजकीय दुर्लक्ष: बलूच लोक पाकिस्तानमध्ये दुय्यम नागरिक असल्याची भावना व्यक्त करतात.
मानवाधिकार हनन: जबरदस्ती बेपत्ता करणे, लष्करी कारवाया आणि दडपशाही यामुळे बलूच समुदाय असंतुष्ट आहे.
पाकमध्ये दहशतवादी हल्ला, प्रवासी ट्रेन हायजॅक; 100 हून अधिक प्रवाशांना ओलीस
बलूच लढ्याची प्रमुख गटं
बलूच लिबरेशन आर्मी (BLA)
बलूचिस्तान लिबरेशन फ्रंट (BLF)
बलूच रिपब्लिकन आर्मी (BRA)
हे गट स्वतःला स्वातंत्र्य सैनिक समजतात. पण पाकिस्तानी सरकार बलूच स्वतंत्रतावादी संघटनांना दहशतवादी मानते, पण .
बलूच संघर्षाची सद्यस्थिती
बलूच गटांनी पाकिस्तानी लष्कर, पायाभूत सुविधा आणि चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर (CPEC) प्रकल्पांवर वारंवार हल्ले केले आहेत. शांततामय मार्गाने बलूच कार्यकर्ते आपले हक्क मागतात, पण त्यांना मोठ्या प्रमाणावर दडपशाहीला सामोरे जावे लागते. पाकिस्तान सरकार आणि लष्कर यांना बलूच बंडखोरी नियंत्रित करण्यात अजूनही अपयश येत आहे.
पुढे काय?
ट्रेन हायजॅक प्रकरणानंतर पाकिस्तानी सैन्य आणि सरकार कोणती पावले उचलणार? हा मोठा प्रश्न आहे. बलूचिस्तानमधील ही चळवळ पाकिस्तानसाठी वाढता धोका ठरत आहे, आणि या हल्ल्यामुळे परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे.
