नेमकं घडलं तरी काय?
मिळालेल्या माहितीनुसार, संपूर्ण प्रकार कल्याण पश्चिमेतील आहे. जिथे कर्वे कुटुंबियासह वास्तव्यास आहे. कर्वे यांच्या वाहनाविरोद्धात वाहतूक विभागाकडून ई-चलन कापण्यात आले. मात्र 17 ऑक्टोबर रोजी दुरुस्तीसाठी स्थानिक गॅरेजमध्ये होती. पण वाहतूक पोलिसांनी ई-चलन देताना कर्वे यांना त्यांची कार काही दिवसांनी कर्वे यांना कल्याण पूर्वेकडील पत्री पूल परिसरात 'नो-पार्किंग'मध्ये कार उभी असे सांगितले गेले आणि 500 रुपयांचे ई-चलन प्राप्त झाला. पण त्यांची प्रत्यक्षात कार गॅरेजमध्ये असताना असे ई-चलन पाठवल्याने कर्वे यांना मोठा धक्का बसला.
advertisement
विलास कर्वे यांनी या चुकीच्या कारवाईवर संताप व्यक्त करत सांगितले की, ही 500 रुपयांची रक्कम नाही मात्र चुकीच्या ई-चलनामुळे होणारी गैरव्यवस्था महत्त्वाची आहे. त्यांचा असा विश्वास आहे की वाहतूक विभाग थेट वाहनचालकांना दंड ठोठावून काही प्रमाणात लूट करत आहे शिवाय ते म्हणाले हा दंड भरणार नाहीत आणि या प्रकरणाची सखोल चौकशी करावी. त्यांनी मागणी केली की, वाहतूक विभागाने अशा चुकीच्या कारवाया तातडीने थांबवाव्यात.
