मेट्रो 8 ही छत्रपती शिवाजी महाराज मुंबई विमानतळ आणि नवी मुंबई विमानतळ यांना जोडणा आहे. मेट्रो 8 सोनेरी मार्गिका असून तिची एकूण लांबी 34.89 किमी आहे. या मार्गिकेवर एकूण 20 स्थानके आहेत, ज्यापैकी 14 स्थानके उन्नत असून 6 स्थानके भूमिगत आहेत.
जाणून घ्या सविस्तर
नवी मुंबईत ही मेट्रो 11 स्थानकांवर थांबेल. वाशी खाडी पूल ओलांडल्यानंतर मानखुर्दपासून मेट्रो शीव-पनवेल महामार्गासोबत समांतर मार्गाने चालेल आणि नंतर नेरूळ, सीवूड्स, उरण मार्गे नवी मुंबई विमानतळापर्यंत पोहोचेल. सध्या मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ हा प्रवास रस्तेमार्गे साधारण दीड ते दोन तास लागतो, पण मेट्रो 8 मार्गिकेने हे अंतर फक्त 40 ते 45 मिनिटांत पार करता येईल.
advertisement
भूमिगत टप्पा छेडानगर ते मुंबई विमानतळापर्यंत 9.25 किमी आहे, तर उन्नत टप्पा 25.63 किमी लांबीचा आहे. हे प्रवाशांसाठी जलद, सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवासाची हमी देईल.
मुख्य स्थानके अशी आहेत- CSMIA T2, LBS मार्ग, S.G. Barve मार्ग, Kurla Central, LTT, घाटकोपर पूर्व, गोवंडी पश्चिम, मानखुर्द, ISBT मानखुर्द, वाशी, सानपाडा, जुईनगर, नेरूळ सेक्टर १, नेरूळ, सीवूड्स, बेलापूर, सागर संगम, तारघर मोहा, NMIए पश्चिम, NMIए T2. या मेट्रोने मुंबई आणि नवी मुंबईतील प्रवास अधिक वेगवान, आरामदायक आणि पर्यावरणपूरक बनविला आहे.
