'नेटल सुरवंट' म्हणजे काय?
हा एका विशिष्ट प्रकारच्या पतंगाचा सुरवंट आहे. त्याच्या अंगावर असलेले काटेरी केस केवळ आकर्षक दिसत नाहीत, तर त्यात सूक्ष्म प्रमाणात विषारी द्रव असते. स्वसंरक्षणासाठी तो या विषाचा वापर करतो. काही ठिकाणी त्याला 'घोणस अळी' असेही म्हणतात. शास्त्रीय भाषेत त्याला Parasa lepida किंवा Slug Moth Caterpillar म्हणून ओळखले जाते. भारत आणि आशियातील काही उष्णकटिबंधीय प्रदेशांमध्ये तो आढळतो.
advertisement
हा धोकादायक का आहे?
या सुरवंटाच्या अंगावरील काट्यांचा चुकूनही स्पर्श झाल्यास व्यक्तीला तीव्र वेदना, जळजळ आणि खाज येते. काही प्रकरणांमध्ये त्वचेवर लाल रंगाचे चट्टे किंवा फोड येऊ शकतात. ज्यांना ॲलर्जीचा त्रास आहे, त्यांना याचा दंश अधिक त्रासदायक ठरू शकतो. त्यामुळे, हा सुरवंट कितीही सुंदर दिसत असला, तरी त्यापासून दूर राहणेच योग्य आहे.
काळजी कशी घ्यावी?
- हा सुरवंट दिसल्यास त्याच्यापासून पुरेसे अंतर ठेवा.
- मुलांना त्याला स्पर्श करू नये, यासाठी सावध करा.
- जर चुकून स्पर्श झाला, तर तात्काळ चिकट टेप त्वचेवर लावून काटे काढून टाका आणि तो भाग साबणाच्या पाण्याने धुवा.
- जळजळ कमी करण्यासाठी बर्फ लावू शकता. त्रास वाढत असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.
हे ही वाचा : Passport: पासपोर्टसाठी चकरा मारण्याची गरज नाही! पुण्यातील इथं 3 दिवसांचा कॅम्प, लगेच करा ऑनलाईन नोंदणी
हे ही वाचा : अनोखं गाव! या 2 निर्णयांमुळे चांगलंच चर्चेत आलंय 'हे' गाव; नियम ऐकाल तर तुम्हीही कौतुक कराल