व्होट जिहादच्या आरोपावर ठाकरे म्हणाले की, ज्यांच्या डोक्यात मेंदू नावाच चीज नाहीयेत, अशी माणसे असे विधान करतायात, असा टोला ठाकरेंनी भाजपला लगावला आहे. पुढे ठाकरे म्हणाले, जरं असेच असेल तर भाजपने पक्षातील सर्व मुस्लिमांना बाहेर काढावं, कुणीच राहु नये, आणि पक्ष कार्यालयात पाटी लावावी. आमच्या पक्षात मुस्लिमांना बंदी आहे,असा सल्ला ठाकरेंनी दिला आहे.
advertisement
ठाकरेंनी पुढे भाजपच्या चुकीच्या धोऱणांचा पाढाच वाचला. शेतकऱ्यांविषयीची धोरणं चुकीची आहे. आमच्या काळात चांगला दर मिळत होता. शेतकऱ्यांसाठी जीएसटी कुठे कमी केला? त्यामुळे 10 वर्षं लोकांनी फक्त थापा ऐकल्यात,अशी टीका ठाकरेंनी भाजपवर केली. मुळचा भाजप आता राहिलेला नाही. आत्ताचा भाजप पक्ष हा अनैसर्गिक आहे. त्यामुळेच मोदी-शाहांची पकड ढिली होत चाललीय, असा हल्लाबोल देखील ठाकरेंनी भाजपवर केला.
मुख्यमंत्री पदावर काय म्हणाले?
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? याबाबतचे संकेत दिले आहे.त्यामुळे महायुतीत बाकी पक्षाला विश्वासात घेत नाही, असा टोला ठाकरेंनी शिंदे, अजित पवारांना लगावला आहे. तसेच आम्ही एकत्रीत पणाने आमचा मुख्यमंत्री कोण होणार ते चर्चा करून ठरवू, असे ठाकरे म्हणाले आहेत.
