चेहऱ्यावर बर्फ वापरण्याचे प्रमुख फायदे
रक्तप्रवाह सुधारतो: चेहऱ्यावर बर्फ लावल्याने त्वचेखालील रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि रक्ताचा प्रवाह वाढतो. यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते आणि त्वचा अधिक निरोगी दिसते.
सूज आणि पुरळ कमी होते: सकाळी उठल्यावर चेहऱ्यावर किंवा डोळ्यांखाली सूज असेल, तर बर्फ लावल्याने ती कमी होते. तसेच, मुरुम किंवा पुरळ आल्यावर बर्फ लावल्यास त्यांची सूज कमी होते आणि वेदनाही कमी होते.
advertisement
छिद्र लहान होतात: चेहऱ्यावरील मोठी छिद्रे अनेकदा धूळ, तेल आणि घाण जमा होण्याचे कारण बनतात. बर्फ लावल्याने ही छिद्रे आकुंचन पावतात आणि त्वचेची छिद्रे लहान होतात, ज्यामुळे त्वचा अधिक गुळगुळीत दिसते.
मुरुमांची समस्या कमी होते: बर्फ लावल्याने मुरुमांची सूज आणि लालसरपणा कमी होतो. बर्फामुळे त्वचेला थंडावा मिळतो, ज्यामुळे तेथील जळजळ कमी होते.
मेकअप टिकून राहतो: मेकअप करण्यापूर्वी चेहऱ्यावर बर्फ घासल्याने मेकअप जास्त वेळ टिकून राहतो. बर्फ लावल्यामुळे छिद्रे लहान होतात, ज्यामुळे मेकअप व्यवस्थित बसतो आणि चेहरा तेलकट दिसत नाही.
थकलेल्या डोळ्यांना आराम: दिवसभर काम केल्यामुळे किंवा कमी झोपेमुळे डोळे थकलेले आणि सुजलेले दिसतात. डोळ्यांभोवती बर्फ फिरवल्याने डोळ्यांना आराम मिळतो आणि सूज कमी होते.
बर्फ कसा वापरावा:
बर्फ थेट चेहऱ्यावर लावू नका. एका स्वच्छ कापडात किंवा रुमालात बर्फाचा तुकडा गुंडाळा आणि मग चेहऱ्यावर हलक्या हाताने फिरवा. हे काम गोलाकार दिशेने करा आणि एकाच जागेवर जास्त वेळ बर्फ ठेवू नका. रोज सकाळी 5 ते 10 मिनिटे हे करू शकता. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)