Ginger Farming: आले शेतीची कमाल, युवा शेतकरी एका वर्षात मालामाल, काय आहे यशाचा फॉर्म्युला?
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
Ginger Farming: छत्रपती संभाजीनगरमधील युवा शेतकऱ्याने पारंपरिक पिकांना फाटा देत दीड एकरात अद्रक शेती केली. यातून लाखोंची कमाई होतेय.
advertisement
1/7

सध्याच्या काळात अनेक शेतकरी पारंपरिक शेतीला फाटा देत वेगळे प्रयोग करत आहेत. छत्रपती संभाजीनगरमधील युवा शेतकऱ्याने असाच प्रयोग आपल्या शेतात केला असून त्यातून लाखोंची कमाई होतेय. अविनाश सपकाळ असं या युवा शेतकऱ्याचं नाव आहे.
advertisement
2/7
आहेर येथील युवा शेतकरी अविनाश सकपाळ यांनी गेल्यावर्षी दीड एकर क्षेत्रात आल्याची लागवड केली. यातून त्यांना 2 लाखांचं उत्पन्न निघालं. आता यंदा पुन्हा अद्रक लावले असून 3 लाखांचं उत्पन्न निघणार असल्याचं अविनाश सांगतात.
advertisement
3/7
अविनाश यांनी एप्रिल-मे महिन्यात शेताची नांगरणी केली होती. त्यानंतर रोटावेटर, शेण खताचा वापर करून मशागत करून घेतली. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ठिबक सिंचन बेड करून अद्रक पिकाची लागवड केली. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यादरम्यान अद्रक काढण्यासाठी तयार होईल.
advertisement
4/7
गेल्या वर्षी अविनाश यांच्या शेतात 107 क्विंटल अद्रक निघाले होते. मात्र, जास्त भाव नसल्यामुळे त्यातून कमी उत्पन्न मिळाले होते. यंदा मात्र 3 लाखांपर्यंत उत्पन्न निघणार असल्याचं ते सांगतात.
advertisement
5/7
शेत जमिनीचा दर्जा सामान्य असेल तर चार ते सहा महिने हे पीक शेतात ठेवता येते. जमिनीचा दर्जा एकदम चांगला असेल तर 15 ते 16 महिने देखील हे पीक ठेवता येते.
advertisement
6/7
अद्रक पिकावर मुख्यतः करपा, टीका, सड किंवा मर हे रोग पडतात. करपा, टीका या रोगांसाठी बुरशीनाशक तसेच कस्टोडिया, कॅब्रोटॉक या औषधांची फवारणी आवश्यक असते. मर रोगासाठी प्रतिबंधक म्हणून सुरुवातीपासूनच ट्रायपोडामाची आवश्यकता असते.
advertisement
7/7
शेतकऱ्यांनी योग्य पद्धतीने अद्रक पिकाची काळजी घेतल्यास ही शेती उसापेक्षा फायद्याची ठरू शकते, असे शेतकरी अविनाश सकपाळ सांगतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/कृषी/
Ginger Farming: आले शेतीची कमाल, युवा शेतकरी एका वर्षात मालामाल, काय आहे यशाचा फॉर्म्युला?