Farmer Success: फोंड्या माळरानावर लावलं पैशाचं पीक, ‘बनगरवाडी’चा शेतकरी कोट्यधीश, कशी केली जादू?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Priti Nikam
Last Updated:
Pink Peru Farming: सांगली जिल्ह्यातील दुष्काळी लेंगरेवाडीच्या शेतकऱ्यानं तैवान पिंक पेरूची लागवड केलीये. 4 वर्षांत ते कोट्यधीश झाले आहेत.
advertisement
1/7

मराठी साहित्यिक व्यंकटेश माडगूळकर यांनी बनगरवाडी या कादंबरीतून लेंगरेवाडी गावचे दुष्काळी परिस्थितीमुळे झालेले विदारक वास्तव मांडले होते. याच गावात आता टेंभू योजनेचे पाणी आले आहे. त्यामुळे आधुनिक शेतीतून काही शेतकरी लाखोंचं उत्पन्न घेत आहेत.
advertisement
2/7
प्रगतशील शेतकरी पांडुरंग डोंगरे हे लेंगरेवाडीच्या फोंड्या माळरानावर आधुनिक शेती करत आहेत. आपल्या शेतीमध्ये विविध प्रयोग करत त्यांनी 5 एकरात तैवान पिंक प्रजातीच्या 7 हजार पेरूच्या झाडांची लागवड केली.
advertisement
3/7
7 हजार तैवान पिंग पेरूच्या शेतीतून लेंगरे यांनी आतापर्यंत तब्बल 150 टन उत्पादन घेतले आहे. उत्तम व्यवस्थापन, योग्य काळजी व शेतीमध्ये वाहून घेत त्यांनी कोट्यधीश होण्याचा बहुमान पटकावला आहे.
advertisement
4/7
तैवान पिंक या पेरूच्या प्रजातीला लागवडीपासून सहा महिन्यानंतर फळधारणा सुरू होते. याची लागवड लेंगरे यांनी बारा बाय पाच अशी केली आहे. एकरी लागवड खर्च 80 हजार आला असून, पेरूची लागवड केल्यानंतर पुढे 15 वर्षे पीक घेता येते.
advertisement
5/7
तैवान पिंक पेरूच्या शेतीचे सध्या चौथे वर्ष असून, दरवर्षी साधारणपणे 150 टन उत्पादन मिळते. जागेवरच फळबागेत व्यापारी माल घेऊन जातात. पेरूला 30 ते 45 रुपये प्रतिकिलो दर मिळतो. एका झाडाला सरासरी 100 फळे येतात आणि त्याचे वजन 60 किलोपर्यंत होते.
advertisement
6/7
पांडुरंग लेंगरे यांच्या संपूर्ण कुटुंबाचे शेतीवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यांची दोन मुले, पत्नी, आई व वडील हे बारकाईने पिकाकडे लक्ष देतात. डाळिंब व पेरू ही दोन फळपिके ते आपल्या शेतात घेतात.
advertisement
7/7
आत्तापर्यंत लेंगरे यांनी सुमारे 150 टन पेरूची विक्री झाली आहे. सरासरी 35 रुपये दराप्रमाणे दरवर्षी 80 ते 90 लाख रुपये उत्पन्न मिळाले, अशी माहिती प्रगतशील शेतकरी पांडुरंग लेंगरे यांनी दिली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/कृषी/
Farmer Success: फोंड्या माळरानावर लावलं पैशाचं पीक, ‘बनगरवाडी’चा शेतकरी कोट्यधीश, कशी केली जादू?