सातारच्या कढीपत्त्याला सातासमुद्रापार मागणी, खर्च वगळून महिन्याला 10 लाख रुपये कमावतोय शेतकरी!
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
Curry leaves farming: कढीपत्ता, मिरची, आलं, लसूण हे रोजच्या फोडणीतले पदार्थ. त्यामुळे ते घराघरात वापरले जातात. अर्थात यांचं पीक घेतलं तर बक्कळ कमाई होऊ शकते. हेच करून दाखवलंय सातारच्या शेतकऱ्यानं. त्यांच्या शेतातला कढीपत्ता पोहोचलाय थेट परदेशात.
advertisement
1/7

साताऱ्यातील शेतकरी हणमंत कूचेकर यांनी आपल्या शेतात नवीन प्रयोग करायचं ठरवलं. त्यांनी कढीपत्त्याची लागवड केली. यातून वर्षाला त्यांची लाखोंची कमाई होतेय. कारण त्यांच्या शेतातल्या कढीपत्त्याला सातासमुद्रापार मागणी आहे.
advertisement
2/7
हणमंत यांनी 2011 साली 50 गुंठ्यात DWD2 सुवासिनी जातीच्या कढीपत्त्याची लागवड केली. वर्षभर व्यवस्थित जोपासना केल्यानंतर पहिल्यांदा जे उत्पादन मिळालं त्यातून त्यांनी मुंबई, पुण्यात विक्री करायला सुरूवात केली.
advertisement
3/7
पुढे हणमंत यांनी सबसिडीवर सोलर ड्रायर घेतला आणि कढीपत्त्याची पानं धुवून वाळवण्यास सुरूवात केली. मग या पानांची पावडर करून त्यांनी तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय कृषी मेळावे, तसंच प्रदर्शनांमध्ये विक्री करायला सुरूवात केली.
advertisement
4/7
कढीपत्त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळायला लागल्यानंतर उत्पादन क्षमता कमी झाली. मग त्यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेतून घेतलेल्या कर्जामधून 500 ते 1000 किलोच्या क्षमतेनं मशिनरी घेऊन व्यवसायाची वाढ करण्याचा प्रयत्न केला. पुढे त्यांनी स्वत:ची वेबसाइट तयार केली. त्यामुळे त्यांची भारताबाहेरही ओळख झाली.
advertisement
5/7
परदेशातील ग्राहक चक्क हणमंत यांच्या बांधावर येऊन भेट देऊ लागले. शिवाय मोठमोठ्या ऑर्डर्स मिळायलाही सुरूवात झाली.
advertisement
6/7
आज ते केवळ कढीपत्ता नाही, तर कढीपत्ता चटणी, सफरचंद पावडर, केळी पावडर असे वेगवेगळे प्रॉडक्ट्स युके, टांझानिया, सौदी अरेबिया, इत्यादी देशांमध्ये निर्यात करतात.
advertisement
7/7
हणमंत दर 3 महिन्याला 500 किलो कढीपत्ता पावडर म्हणजे 25 टन ओला कढीपत्ता ट्रान्सपोर्ट करतात. ट्रान्सपोर्ट केलेल्या कढीपत्त्याचा 5 ते 7 पटीने जास्त वाढीव दर मिळतो. 'सर्व खर्च वगळून मला पूर्ण व्यवसायातून 10 लाख रुपये वार्षिक उत्पन्न मिळतं', अशी माहिती हणमंत कुचेकर यांनी दिली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/कृषी/
सातारच्या कढीपत्त्याला सातासमुद्रापार मागणी, खर्च वगळून महिन्याला 10 लाख रुपये कमावतोय शेतकरी!