TRENDING:

Success story : नोकरी मिळत नसल्यामुळे घेतला उलट निर्णय, एका एकरमध्ये केली बटाटा लागवड, 3 लाख नफा

Last Updated:
नोकरीच्या मागे न लागता त्यांनी आपली शेती सुधारण्याचा निर्धार केला आणि एका एकर क्षेत्रामध्ये बटाट्याची लागवड करून चांगले उत्पन्न मिळवता येते, हे सिद्ध करून दाखवले.
advertisement
1/5
नोकरी मिळत नसल्यामुळे घेतला उलट निर्णय, एका एकरमध्ये केली बटाटा लागवड, 3 लाख नफा
शिक्षण असूनही नोकरी मिळत नसल्याने अनेक तरुण निराश होतात. पण बीड जिल्ह्यातील दीपक सोनवणे या तरुण शेतकऱ्याने मात्र उलट निर्णय घेतला. नोकरीच्या मागे न लागता त्यांनी आपली शेती सुधारण्याचा निर्धार केला आणि एका एकर क्षेत्रामध्ये बटाट्याची लागवड करून चांगले उत्पन्न मिळवता येते, हे सिद्ध करून दाखवले. मागील वर्षभरात त्यांनी केलेल्या प्रयोगातून त्यांना सुमारे 3 लाख रुपयांचा नफा मिळाला असून, त्यांची सुरुवात अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
advertisement
2/5
दीपक सोनवणे यांचे शिक्षण हे कृषी क्षेत्रात झाले आहे. त्यांनी नोकरीसाठी अनेक ठिकाणी अर्ज केले, मुलाखती दिल्या, पण समाधानकारक संधी मिळाली नाही. मात्र त्यांनी निराशा न बाळगता शेतीत नव्या पद्धतीने प्रयत्न करूया असा विचार करून बटाट्याची लागवड करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला कुटुंबीयांनी थोडी काळजी व्यक्त केली, परंतु दीपक यांची जिद्द पाहता त्यांनी साथ दिली. त्यानंतर या शेती प्रयोगाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली.
advertisement
3/5
बटाट्याच्या लागवडीतील सर्वात मोठं आव्हान होतं पाण्याची कमतरता. एक एकर क्षेत्रामध्ये सिंचनाची कोणतीही सुविधा उपलब्ध नव्हती. मात्र, दीपक यांनी हा अडथळा दूर करण्यासाठी घरच्यांच्या मदतीने बोरवेल घेतली आणि सुदैवाने पाणीही उपलब्ध झाले. त्यानंतर ठिबक सिंचन, माती परीक्षण आणि योग्य खत व्यवस्थापनाचा वापर करून त्यांनी शास्त्रशुद्ध पद्धतीने शेती केली. त्याचा थेट परिणाम उत्पादनावर झाला आणि कमी क्षेत्रातही लखलाभ शक्य असल्याचे सिद्ध झाले.
advertisement
4/5
उत्पादनावरच भर न देता दीपक सोनवणे यांनी बाजारपेठेचा अभ्यास केला. यंदा चांगल्या वेळेत बटाट्याची विक्री केल्याने त्यांना चांगला दर मिळाला आणि नफ्यात वाढ झाली. अशा प्रकारे एका वर्षातच त्यांनी सुमारे 3 लाख रुपयांचा नफा कमावला. त्यांच्या शेतातील गुणवत्तापूर्ण उत्पादनामुळे व्यापाऱ्यांनीही थेट शेतातूनच खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे त्यांच्या आर्थिक स्थितीत सकारात्मक बदल झाला आहे.
advertisement
5/5
दीपक सोनवणे यांचा हा प्रवास अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. कृषी शिक्षण घेतलेल्या युवकांनी नोकरीच्या मागे धावण्यापेक्षा शेतीत नव्या संधी शोधाव्यात, असा संदेश त्यांच्या यशातून मिळतो. कोरडवाहू भागातही योग्य नियोजन, तांत्रिक माहिती आणि कष्ट यांद्वारे शेतीत भरघोस नफा मिळू शकतो, हे दीपक यांनी सिद्ध केले आहे. त्यांच्या या यशोगाथेतून एक संदेश स्पष्ट दिसतो शेती ही केवळ उदरनिर्वाहाचे साधन नसून एक फायदेशीर व्यवसायही ठरू शकतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/कृषी/
Success story : नोकरी मिळत नसल्यामुळे घेतला उलट निर्णय, एका एकरमध्ये केली बटाटा लागवड, 3 लाख नफा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल