TRENDING:

Farmer Success Story: दूध व्यवसाय करावा तर असा, महिन्याला शेतकऱ्याची 18 लाख रुपयांपर्यंत उलाढाल, सांगितला यशाचा मंत्र

Last Updated:
Farmer Success Story: शेतकरी सध्या व्यवसाय करण्याला प्राधान्य देत आहेत. राजू गोजे महिन्याला लाखोंची उलाढाल करतात.
advertisement
1/7
दूध व्यवसाय करावा तर असा, महिन्याला शेतकऱ्याची 18 लाख रुपयांपर्यंत उलाढाल
शेतकरी सध्या व्यवसाय करण्याला प्राधान्य देत आहेत. छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील कुंभेफळ गावातील राजू गोजे हे 3 वर्षांपासून दूध संकलन केंद्र चालवतात.
advertisement
2/7
सुरुवातीच्या काळात 80 लिटरच्या जवळपास दूध संकलन व्हायचे, त्यानंतर वाढ होत गेली आणि आजच्या घडीला त्यांच्याकडे सकाळी 600 लिटर दूध आणि संध्याकाळी 600 असे एकूण बाराशे ते तेराशे लिटर दुधाचे दररोज संकलन होते. यामधून ते महिन्याला लाखोंची उलाढाल करतात.
advertisement
3/7
राजू गोजे यांच्याकडे असलेल्या गाईचे 50 लिटर दूध निघते. या दूध संकलन व्यवसायाच्या माध्यमातून दररोज 70 ते 80 हजार उलाढाल होत असते.
advertisement
4/7
तसेच गोजे यांच्याकडे दूध कुलिंगचे, फॅट चेक करण्याचे आणि बिलिंग असे विविध यंत्रे देखील आहेत. या दूध संकलन व्यवसायातून त्यांची महिन्याला 18 लाख रुपयांपर्यंत उलाढाल होते तर निव्वळ नफा 8 लाख रुपये मिळतो, असे राजू गोजे यांनी लोकल 18 सोबत बोलताना सांगितले.
advertisement
5/7
कुंभेफळ येथील गोजे यांच्याकडे दूध संकलन झाल्यानंतर टँकरद्वारे या दुधाची पुढील दूध संकलन केंद्रापर्यंत वाहतूक केली जाते आणि त्यानंतर त्या दुधावर प्रक्रिया करून पनीर बनवणे, दही, तूप असे विविध दुग्धजन्य पदार्थ तयार करण्यात येतात.
advertisement
6/7
तसेच नवीन शेतकऱ्यांनी दुग्ध संकलन व्यवसायात येण्याअगोदर काही महत्त्वाची काळजी देखील घेणे आवश्यक आहे त्यामुळे सर्वप्रथम नवउद्योजकांनी आपली स्वतःची तयारी ठेवणे महत्त्वाचे आहे, मजुरांच्या विश्वासावर हे काम करणे कठीण आणि खर्चिक आहे. स्वतः सगळी कामे केली तर दुग्ध व्यवसायात 50 टक्के निव्वळ नफा मिळतो.
advertisement
7/7
दूध संकलन केंद्र चालवण्यासाठी गोजे यांचा पुतण्या देखील येथे काम करतो, अमोल गोजे हा तरुणांना सांगतो की तुम्हाला लहानपणापासून दूध व्यवसायाची ओढ असेल तर या व्यवसायात पदार्पण करायला हवे व्यवसायाविषयी आपल्याला माहिती नसेल आणि घरचे कोणी हा व्यवसाय करत नसेल सध्याच्या वेळी दूध व्यवसायात नाही आलेले चांगले कारण आपले वडील, काका हे दुग्ध व्यवसायात काम करत असतील तर नक्कीच काम करणे सोपे पडते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/कृषी/
Farmer Success Story: दूध व्यवसाय करावा तर असा, महिन्याला शेतकऱ्याची 18 लाख रुपयांपर्यंत उलाढाल, सांगितला यशाचा मंत्र
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल