सई ताम्हणकर-Smriti Mandhana ची सेम टू सेम चॉईस, सांगलीसोबत खास कनेक्शन, दोघींनाही आवडते एकच गोष्ट
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Smriti Mandhana-Sai Tamhankar : स्मृती मानधनाची एक जुनी मुलाखत व्हायरल झाली, ज्यात तिने एका खास पदार्थाचा उल्लेख केला आहे. विशेष म्हणजे, याच पदार्थावर सांगलीची आणखी एक प्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकरचेही प्रेम आहे.
advertisement
1/8

मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाने ३० ऑक्टोबरला दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा अंतिम सामना जिंकून इतिहास रचला आणि या विजयानंतर संघातील प्रत्येक खेळाडू चर्चेत आहे.
advertisement
2/8
यात महाराष्ट्राच्या, विशेषतः सांगलीच्या, स्मृती मानधनाची लोकप्रियता कमालीची वाढली आहे. स्मृतीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आणि तिच्या आवडीनिवडीबद्दल जाणून घेण्यासाठी चाहत्यांमध्ये खूप उत्सुकता आहे.
advertisement
3/8
स्मृती मानधनाची एक जुनी मुलाखत व्हायरल झाली, ज्यात तिने एका खास पदार्थाचा उल्लेख केला आहे. विशेष म्हणजे, याच पदार्थावर सांगलीची आणखी एक प्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकरचेही प्रेम आहे.
advertisement
4/8
स्मृती मानधनाने एका मुलाखतीत तिच्या आवडत्या पदार्थांबद्दल सांगितले. तिने सांगितले की, तिला सांगलीतील प्रसिद्ध संभा भेळ प्रचंड आवडते.
advertisement
5/8
स्मृती म्हणाली, "मला गोड भेळ जास्त आवडते, मी तिखट भेळ खात नाही. सांगलीत एक स्पेशल भेळ मिळते, संभा भेळ. मी त्यांना नेहमी म्हणते की, शक्य झालं असतं तर प्रत्येक ठिकाणी मी तुमचा गाडा घेऊन गेले असते, मला ती भेळ इतकी आवडते."
advertisement
6/8
स्मृती मानधनाच्या तोंडातून हे नाव बाहेर पडताच नेटकऱ्यांनी लगेचच एक खास कनेक्शन शोधून काढले. स्मृतीचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर चाहत्यांना लगेचच सई ताम्हणकरची जुनी मुलाखत आठवली. सई ताम्हणकर हिने देखील तिच्या अनेक मुलाखतींमध्ये संभा भेळची तारीफ केली आहे.
advertisement
7/8
एका मुलाखतीत सई म्हणाली होती की, "आमच्याकडे एक संभाची भेळ म्हणून आहे, ती खूपच फेमस आहे. त्याच्यासारखी भेळ मी तरी कुठे खाल्ली नाहीये." यावरून स्पष्ट होते की, सांगलीच्या या दोन लेकी, एकाला क्रिकेटच्या मैदानात आणि दुसऱ्याला रुपेरी पडद्यावर यश मिळाल्यानंतरही, आपल्या सांगलीच्या मातीतील चव विसरल्या नाहीत.
advertisement
8/8
दरम्यान, स्मृती मानधना संगीत दिग्दर्शक आणि निर्माता पलाश मुच्छल याच्यासोबत लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याच्या जोरदार चर्चा आहेत. त्यांचा विवाहसोहळा सांगलीतच पार पडणार असल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे चाहत्यांना आता स्मृतीच्या लग्नाची आणि तिच्या 'संभा भेळ' पार्टीचीही उत्सुकता लागून राहिली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
सई ताम्हणकर-Smriti Mandhana ची सेम टू सेम चॉईस, सांगलीसोबत खास कनेक्शन, दोघींनाही आवडते एकच गोष्ट