IND vs SA : 'बिग बॉस'सोबत पंगा महागात पडला, तीन दिग्गजांना टीम इंडियामध्ये एन्ट्री 'बॅन'!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन टेस्ट मॅचच्या सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. ऋषभ पंतचं भारतीय टीममध्ये कमबॅक झालं आहे, तर एन जगदीशन याला टीममधून डच्चू देण्यात आला आहे.
advertisement
1/9

भारताची टेस्ट टीम : शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल, नितीश कुमार रेड्डी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, आकाश दीप
advertisement
2/9
इंग्लंड दौऱ्यातल्या चौथ्या टेस्टवेळी ऋषभ पंतच्या पायाला फ्रॅक्चर झालं होतं, त्यामुळे तो वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये खेलू शकला नव्हता. आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पंतचं टीममध्ये कमबॅक झालं आहे, सोबतच त्याला उपकर्णधारपदही परत मिळालं आहे.
advertisement
3/9
दक्षिण आफ्रिका सीरिजसाठी टीमची घोषणा व्हायच्या आधी 3 भारतीय खेळाडूंनी निवड समिती प्रमुख अजित आगरकरसोबत पंगा घेतला होता. या तिघांनी उघडपणे टीम निवडीवर टीका केली होती, पण तिघांचीही टीममध्ये निवड झाली नाही.
advertisement
4/9
मोहम्मद शमी हा मागच्या काही काळापासून टीम इंडियातून बाहेर आहे. मोहम्मद शमीच्या फिटनेसबद्दल निवड समिती प्रमुख अजित आगरकरने उघडपणे भाष्य केलं, त्यानंतर शमीनेही प्रत्युत्तर दिलं. मी फिट असल्याचं निवड समितीला कळवणार नाही, त्यांनी माझ्यासोबत संपर्क साधावा, असं शमी म्हणाला होता.
advertisement
5/9
अजित आगरकरवर टीका करताना शमीने मैदानातही धमाका केला. बंगालकडून रणजी ट्रॉफीमध्ये खेळत असताना शमीने पहिल्या दोन सामन्यांमध्ये 15 विकेट घेतल्या. या कामगिरीनंतरही त्याचं टीम इंडियात कमबॅक झालं नाही.
advertisement
6/9
अजिंक्य रहाणे यानेही टीम इंडियाच्या निवडीवर नाराजी व्यक्त केली होती. ऑस्ट्रेलियामध्ये टीमला माझी गरज होती, पण कुणीही माझ्यासोबत संवाद साधला नाही. मला चान्स मिळायला पाहिजे होता. टीममध्ये तरुणांची गरज असते, पण त्यासोबतच अनुभवी खेळाडूही लागतात, असं रहाणे म्हणाला होता.
advertisement
7/9
रणजी ट्रॉफीमध्ये अजिंक्य रहाणेने छत्तीसगडविरुद्ध 159 रनची खेळी केली, पण त्यानंतरही दक्षिण आफ्रिका सीरिजसाठी अजिंक्य रहाणेच्या नावाचा विचार झाला नाही.
advertisement
8/9
तब्बल 8 वर्षांनंतर टीम इंडियात कमबॅक करणाऱ्या करुण नायरनेही निवड समितीबद्दल नाराजी व्यक्त केली होती. इंग्लंड दौऱ्यात फक्त एक अर्धशतक केल्यानंतर करुण नायरला टीमबाहेर केलं गेलं. करुणकडून आमची चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती, असं आगरकर म्हणाला होता.
advertisement
9/9
आगरकरच्या या वक्तव्यावर करुणने प्रतिक्रिया दिली. मागच्या 2 वर्षात मी सातत्याने कामगिरी केली, त्यामुळे मला आणखी संधी मिळायला पाहिजे होती, असं नायर म्हणाला. यानंतर करुणने गोव्याविरुद्ध नाबाद 174 रनची खेळी केली, पण तरीही करुण नायरची भारतीय टीममध्ये निवड झाली नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs SA : 'बिग बॉस'सोबत पंगा महागात पडला, तीन दिग्गजांना टीम इंडियामध्ये एन्ट्री 'बॅन'!