
सांगली - भात पिकाचे आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिराळा तालुक्यात विविध प्रकारच्या भाताचे उत्पादन घेतले जाते. इथल्या पोषक वातावरणात आधुनिक वाणांचे भातही उत्तम पिकतात. तुलनेने भरपूर उत्पन्न देणारी आधुनिक बियाणे असताना शिराळकरांनी पूर्वीपासूनच 'शिराळी मोठा भात' बियाणे जतन केले आहे. नेमकं काय आहे यामागचे कारण, याचबाबत आपण आज जाणून घेणार आहोत.
Last Updated: November 05, 2025, 19:41 ISTजालना: भारताच्या जडणघडणीत पारशी समजाचा मोठा वाटा आहे. पर्शियातून आलेले पारशी बांधव ब्रिटिश काळात संपूर्ण भारतभरात विखुरले गेले. जालना शहरातही काही लोक या काळात वास्तव्यास होते. सध्या ते या ठिकाणी वास्तव्यास नसले तरी त्यांच्या वास्तव्याच्या पाऊखुणा आजही याठिकाणी आहेत. त्यापैकीच एक म्हणजे टॉवर ऑफ सायलेन्स म्हणजेच पारशी समाजाची स्मशानभूमी. या स्मशानभूमीत पारशी लोकांचे अंत्यविधी कसे केले जात होते? आपण इतिहास अभ्यासक रवीचंद्र खर्डेकर यांनी माहिती दिलीये.
Last Updated: November 05, 2025, 18:52 ISTछत्रपती संभाजीनगर : सध्याचे जग हे डिजिटल जग आहे. या डिजिटल युगामध्ये आत्ताची तरुण पिढी किंवा लहान मुलं आहेत हे पूर्णपणे डिजिटल माध्यमांच्या आहारी गेल्याचे दिसून येत आहे. यामुळेच सध्या लहान मुलांमध्ये स्वमग्नतेचे प्रमाण खूप जास्त वाढले आहे. त्यांच्यासाठी ही एक अत्यंत घातक गोष्ट आहे. त्यामुळे अशावेळी पालकांनी काय करावे, नेमकं काय उपाययोजना कराव्यात, याविषयी लोकल18 च्या टीमने मानसोपचारतज्ज्ञ मधुरा अन्वीकर यांच्याशी विशेष संवाद साधला.
Last Updated: November 05, 2025, 18:21 ISTसांगली: रुबादार, अवाढव्य आणि नजरेत भरेल असा हा रेडा पहा. या रेड्याची किंमत आहे तब्बल दीड कोटी. सध्या सांगलीच्या पलूसमधील 'यशवंत' कृषी प्रदर्शनचं हा मुख्य आकर्षण ठरतो आहे. दीड टन वजनाच्या आणि दीड कोटी किमतीच्या हिंद केसरी गजेंद्र रेड्याविषयी अधिक लोकल18च्या प्रतिनिधींनी रेडा मालक ज्ञानेश्वर विलास नाईक यांच्याकडून अधिक जाणून घेतले.
Last Updated: November 05, 2025, 17:29 ISTसगळीकडेच टॅटू बनविण्याचा मोठा क्रेझ सुरू आहे. त्यामुळे मार्केटमध्ये अनेक टॅटू आर्टिस्ट देखील उपलब्ध झाले आहेत. तर अनेक ठिकाणी रस्त्यावर देखील अगदी कमी पैशात टॅटू काढून मिळत असतात. परंतु तुम्हाला हे ठाऊक आहे का? आपण काढत असलेल्या टॅटू हा आपल्यासाठी काही वेळेस हानिकारक ठरू शकतो. टॅटू काढताना कोणती काळजी घ्यावी? हे तुम्हाला ठाऊक आहे का? टॅटू काढताना काय काळजी घ्यावी, हे ठाऊक असणं गरजेचे आहे. टॅटू काढताना कोणत्या गोष्टींवर आपण लक्ष देणे गरजेचे आहे. हे आज आपण नाशिक येथील प्रोफेशनल टॅटू आर्टिस्टकडून जाणून घेणार आहोत.
Last Updated: November 05, 2025, 16:58 IST