
सगळीकडेच टॅटू बनविण्याचा मोठा क्रेझ सुरू आहे. त्यामुळे मार्केटमध्ये अनेक टॅटू आर्टिस्ट देखील उपलब्ध झाले आहेत. तर अनेक ठिकाणी रस्त्यावर देखील अगदी कमी पैशात टॅटू काढून मिळत असतात. परंतु तुम्हाला हे ठाऊक आहे का? आपण काढत असलेल्या टॅटू हा आपल्यासाठी काही वेळेस हानिकारक ठरू शकतो. टॅटू काढताना कोणती काळजी घ्यावी? हे तुम्हाला ठाऊक आहे का? टॅटू काढताना काय काळजी घ्यावी, हे ठाऊक असणं गरजेचे आहे. टॅटू काढताना कोणत्या गोष्टींवर आपण लक्ष देणे गरजेचे आहे. हे आज आपण नाशिक येथील प्रोफेशनल टॅटू आर्टिस्टकडून जाणून घेणार आहोत.
Last Updated: November 05, 2025, 16:58 ISTछत्रपती संभाजीनगर : सध्याचे जग हे डिजिटल जग आहे. या डिजिटल युगामध्ये आत्ताची तरुण पिढी किंवा लहान मुलं आहेत हे पूर्णपणे डिजिटल माध्यमांच्या आहारी गेल्याचे दिसून येत आहे. यामुळेच सध्या लहान मुलांमध्ये स्वमग्नतेचे प्रमाण खूप जास्त वाढले आहे. त्यांच्यासाठी ही एक अत्यंत घातक गोष्ट आहे. त्यामुळे अशावेळी पालकांनी काय करावे, नेमकं काय उपाययोजना कराव्यात, याविषयी लोकल18 च्या टीमने मानसोपचारतज्ज्ञ मधुरा अन्वीकर यांच्याशी विशेष संवाद साधला.
Last Updated: November 05, 2025, 18:21 ISTसांगली: रुबादार, अवाढव्य आणि नजरेत भरेल असा हा रेडा पहा. या रेड्याची किंमत आहे तब्बल दीड कोटी. सध्या सांगलीच्या पलूसमधील 'यशवंत' कृषी प्रदर्शनचं हा मुख्य आकर्षण ठरतो आहे. दीड टन वजनाच्या आणि दीड कोटी किमतीच्या हिंद केसरी गजेंद्र रेड्याविषयी अधिक लोकल18च्या प्रतिनिधींनी रेडा मालक ज्ञानेश्वर विलास नाईक यांच्याकडून अधिक जाणून घेतले.
Last Updated: November 05, 2025, 17:29 ISTग्रामीण भागात काम करणारे शेतकरी, पशुपालक आणि झुडपांच्या परिसरात राहणारे नागरिक यांना या आजाराचा धोका अधिक असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येते. लवकर निदान न लागल्यास स्क्रब टायफस जीवघेणा ठरू शकतो. त्यामुळे कोणतेही दुखणे आढळून आल्यास लगेच डॉक्टरांना दाखवणे आणि योग्य उपचार घेणे गरजेचे आहे. स्क्रब टायफस या आजाराची लक्षणे कोणती? हा आजार नेमका कशाने होतो? तसेच काय उपाययोजना कराव्यात? याबाबत माहिती डॉ. धीरज आंडे यांनी दिली आहे.
Last Updated: November 05, 2025, 16:29 ISTआजच्या धकाधकीच्या जीवनात तणाव हा प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. कामाचा ताण, आर्थिक जबाबदाऱ्या, कौटुंबिक अडचणी आणि वैयक्तिक चिंता यांमुळे माणूस सतत तणावाखाली जगतो. पण या मानसिक दडपणाचा शरीरावरही गंभीर परिणाम होतो. अनेकांना असं जाणवतं की, तणाव वाढल्यावर वजनही वाढतं. ही फक्त योगायोगाची गोष्ट नसून त्यामागं ठोस वैज्ञानिक कारणं दडलेली आहेत.
Last Updated: November 05, 2025, 15:56 IST