Success Story : पारंपरिक शेती करण्यापेक्षा लावलं डोकं, शेतकरी करतोय लाखांत कमाई, नेमकं काय केलं?
- Published by:Mohan Najan
- local18
Last Updated:
सहा वर्षांपासून सीताफळाची शेती करत आहेत. एक एकर शेतामध्ये एनएमके गोल्डन या वाणाची 450 झाडांची लागवड त्यांनी केली. 
advertisement
1/5

 छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील नागोनीची वाडी येथील शेतकरी विठ्ठल शिसोदे हे गेल्या सहा वर्षांपासून सीताफळाची शेती करत आहेत. एक एकर शेतामध्ये एनएमके गोल्डन या वाणाची 450 झाडांची लागवड त्यांनी केली. सध्या शेतकऱ्यांकडून सीताफळाची व्यापाऱ्यांना 30 रुपये किलो दराने विक्री होत आहे.
advertisement
2/5
 असे भाव राहिल्यास 1.50 लाख रुपयांचे उत्पन्न मिळेल. सीताफळाची 30 रुपये किलो दरांपेक्षा जास्त विक्री झाल्यास 3 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न निघेल, अशी अपेक्षा शिसोदे यांनी लोकल 18 सोबत बोलताना व्यक्त केली.
advertisement
3/5
 सीताफळ उत्पादक शेतकरी विठ्ठल सिसोदे हे गेल्या तीन वर्षांपासून सीताफळाचे उत्पन्न मिळवत आहेत, तिसऱ्या वर्षी सरासरी 125 कॅरेट सीताफळ निघाले, चौथ्या वर्षी त्याच एक एकर शेतात 250 कॅरेट सीताफळ निघाले. यंदाचे पाचवे वर्ष आहे आता 300 कॅरेट सीताफळ निघतील असा अंदाज त्यांचा आहे.
advertisement
4/5
 सीताफळामध्ये नफा भरपूर आहे फक्त योग्य भाव मिळाला पाहिजे, भाव स्थिर नसल्यामुळे उत्पन्न कमी - जास्त होते. सीताफळ जास्त पिकल्यास ते खराब होण्यास सुरुवात होते सध्या पावसाचे वातावरण निर्माण झाल्यामुळे सीताफळाची काढणी वेगाने सुरू आहे.
advertisement
5/5
 सीताफळाची शेती करण्यासाठी विशेष अशी काळजी घेणे गरजेची नाही पण शेणखत वापरणे, झाडांची परिस्थिती पाहून फवारणी करणे हे महत्त्वाचे ठरते. ज्या शेतकऱ्यांकडे जास्त शेती आहे त्यांच्या सीताफळाची शेती फायद्याची आहे त्यामुळे त्यांनी ही शेती करण्यास हरकत नाही, असे देखील सिसोदे यांनी म्हटले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/कृषी/
Success Story : पारंपरिक शेती करण्यापेक्षा लावलं डोकं, शेतकरी करतोय लाखांत कमाई, नेमकं काय केलं?