TRENDING:

'ऐकूणच अंगावर शहारे येतात!', मराठी अभिनेत्री सापडली असती रोहित आर्यच्या तावडीत? समोर आली धक्कादायक माहिती

Last Updated:
Marathi Actress Contact with Rohit Arya : मुंबईतील RA स्टुडिओमध्ये 17 मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्यच्या संपर्कात मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री रुचिता जाधवदेखील आली होती.
advertisement
1/7
अभिनेत्री सापडली असती रोहित आर्यच्या तावडीत? समोर आली धक्कादायक माहिती
मुंबईतील पवई परिसरातील RA स्टुडिओमध्ये 30 ऑक्टोबरच्या गुरुवारी एक धक्कादायक घटना घडली. रोहित आर्य नामक एका व्यक्तीने 17 मुलांना ओलीस ठेवलं होतं. विशेष म्हणजे मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री रुचिता जाधवदेखील रोहित आर्यच्या संपर्कात आली होती.
advertisement
2/7
अभिनेत्री रुचिता जाधवला रोहित आर्यने काही दिवसांपूर्वीच आपल्या चित्रपटासंबंधित कामासाठी बोलावलं होतं.
advertisement
3/7
रुचिता जाधवने रोहित आर्यसोबतच्या व्हॉट्सअॅप चॅटचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
advertisement
4/7
रुचिता जाधवने PTI ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, 4 ऑक्टोबरला रोहित आर्य नामक व्यक्तीने मला मेसेज केला होता. आपण एक फिल्ममेकर आहोत आणि आता आपण होस्टेज सिचुएशनवर आधारित चित्रपट बनवत असल्याचं त्यांनी मला सांगितलं".
advertisement
5/7
रोहित आर्यने 23 ऑक्टोबरला पुन्हा एकदा रुचिताला मेसेज केला आणि विचारलं की, 27, 28, 29 ऑक्टोबरला ती पवईतील RA स्टुडिओमध्ये भेटू शकते का?". त्यावर रुचिताने 28 ऑक्टोबरला भेटण्यास होकार दिला होता. पण कौटुंबिक कारणाने ती रोहित आर्यला भेटू शकली नाही.
advertisement
6/7
रुचिताने आता पोस्ट शेअर करत लिहिलं आहे,"आता ऐकूणच घाबरायला होतंय की मी रोहित आर्यला भेटायला गेले असते तर काय झालं असतं. देव आणि माझ्या कुटुंबियांचे खूप-खूप आभार त्यांनी मला त्यादिवशी घराबाहेर जाण्यापासून रोखलं".
advertisement
7/7
रुचिता पुढे म्हणतेय,"या घटनेने मला आयुष्यभरासाठीचा धडा दिला आहे. यापुढे कामासंदर्भात कोणाला भेटायला जाण्याआधी मी सावध राहिल".
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'ऐकूणच अंगावर शहारे येतात!', मराठी अभिनेत्री सापडली असती रोहित आर्यच्या तावडीत? समोर आली धक्कादायक माहिती
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल