मक्याच्या दरात चढ-उतार
राज्याच्या कृषीमार्केट मध्ये आज एकूण 10 हजार 235 क्विंटल मक्याची एकूण आवक झाली. यापैकी धुळे मार्केटमध्ये 2848 क्विंटल मक्याची सर्वाधिक आवक झाली. त्यास प्रतीनुसार कमीत कमी 838 ते जास्तीत जास्त 1493 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे बाजार भाव मिळाला. तसेच मुंबई मार्केटमध्ये आवक झालेल्या 132 क्विंटल मक्यास 2800 ते 3500 रुपये दरम्यान सर्वाधिक भाव मिळाला.
advertisement
सोलापूरच्या या गावात चुकूनही तोडत नाहीत कडूलिंबाचं पान, कारण काय तर
कांदा उच्चांकी आवक
राज्याच्या मार्केटमध्ये 2 लाख 08 हजार 681 क्विंटल कांद्याची एकूण आवक झाली. यापैकी 1लाख, 09 हजार 769 क्विंटल सर्वाधिक आवक नाशिक बाजारात झाली. त्यास प्रतीनुसार कमीत कमी 437 ते जास्तीत जास्त 1949 रुपयांपर्यंत बाजार भाव मिळाला. तसेच सोलापूर मार्केटमध्ये आवक झालेल्या 958 क्विंटल पांढऱ्या कांद्यास प्रतीनुसार 200 ते 3100 रुपये दरम्यान बाजार भाव मिळाला.
सोयाबीन आवक
राज्याच्या मार्केटमध्ये 71 हजार 961 क्विंटल सोयाबीनची एकूण आवक झाली. यापैकी लातूर मार्केटमध्ये सर्वाधिक 27 हजार 024 क्विंटल आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 3987 ते 4455 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला. तसेच नाशिक मार्केटमध्ये 75 क्विंटल सोयाबीनची आवक होऊन त्यास 4451 रुपये सर्वाधिक सर्वसाधारण बाजारभाव मिळाला.





