जपानी तंत्रज्ञानाचा दोडका शेतीसाठी वापर, शेतकऱ्याला झाला फायदा, एकरी मिळवलं तब्बल 13 टन उत्पादन
- Published by:Mohan Najan
- Reported by:Priti Nikam
Last Updated:
विजय शिंदे यांनी दोडका पिकात जपानी तंत्रज्ञानाचा वापर करत एकरी तब्बल 13 टन दोडका उत्पादित केला आहे. दोडक्यावर फवारणीसाठी जपानी तंत्रजानावर आधारित केंगिन पाण्याची पीएचनुसार औषध फवारणी करत उत्पादन वाढीचा प्रयोग यशस्वी केला आहे.
advertisement
1/7

सांगलीच्या ऊस पट्ट्यातील वाळवा एक महत्त्वाचा तालुका. वाळव्यातील सर्वाधिक शेती क्षेत्र असणाऱ्या गावांपैकी आष्ट्यातील शेतकरी प्रगतशील शेती करतात. यापैकीच प्रयोगशील शेतकरी विजय शिंदे यांनी दोडका पिकात जपानी तंत्रज्ञानाचा वापर करत विक्रमी उत्पादन घेतले आहे. एकरी तब्बल 13 टन दोडका उत्पादित करण्यासाठी त्यांनी कोणते तंत्र वापरले? त्याबद्दलची माहिती घेण्यासाठी लोकल 18 च्या प्रतिनिधींनी विजय शिंदे यांच्याशी संवाद साधला.
advertisement
2/7
विजय बाळासो शिंदे हे आष्टा गावातील पदवीधर शेतकरी आहेत. त्यांच्याकडे सहा एकर शेतजमीन असून ते गेल्या 15 वर्षांपासून शेती करत आहेत. चार एकर क्षेत्रावरती ऊस आणि केळी तर दोन एकर शेतजमिनीवर भाजीपाला पिकवतात. ऊस आणि केळी पिकातून वर्षातून एकदाच आर्थिक उत्पन्न मिळत असल्याने भाजीपाला पिकात सातत्य ठेवल्याचे त्यांनी सांगितले.
advertisement
3/7
विजय यांनी एक एकर क्षेत्रामध्ये 'माला एफ वन' दोडक्याची लागवड केली. पाच फूट बाय अडीच फुटांवर दोडक्याच्या शेतात दोडक्याची लागवड केली. मल्चिंग पेपर, काठी, तार यांचा खर्च वाचला.
advertisement
4/7
ठिबकने पाणी तसेच पाण्यात विरघळणारी रासायनिक आणि सेंद्रिय खते देतात. सेंद्रिय खतावर सर्वाधिक भर दिल्याचे शिंदे यांनी सांगितले. या पूर्वी एक एकर शेतजमिनी वरती उभी- आडवी नांगरट करून पाच फूट अंतरावरती बेड तयार केले होते.
advertisement
5/7
लागवडीनंतर सुमारे दीड महिन्यात दोडका येण्यास सुरुवात झाली. दररोज 200 ते 250 किलो उत्पन्न निघाले. उत्तम क्वालिटी असल्याने दोडक्याला प्रति किलो 30 ते 35 रुपये दर मिळाला. योग्य व्यवस्थापन केल्याने विजयी यांना दोडका पिकातून तब्बल 13 टनाचे विक्रमी उत्पादन मिळाले. खर्च वजा जाता तीन महिन्यात 3 लाखांचा आर्थिक फायदा झाल्याचे त्यांनी सांगितले.
advertisement
6/7
विजय यांनी घरी वापरण्यासाठी जपानी तंत्रज्ञानावर आधारित केंगन पाण्याची मशीन खरेदी केली आहे. यातून अल्कलाइन पाण्याची पीएचनुसार औषध फवारणी केल्याने पिकाला ऑक्सिजन समृद्ध पाणी मिळाले आहे. यामुळे प्रकाश संश्लेषणाची क्रिया वेळेत होऊन फुलकळी फुलली. सूक्ष अन्नद्रव्य खते मिळाल्याने पिकाची चांगली वाढ होण्यास मदत झाली.
advertisement
7/7
साधारणपणे दोडका या पिकातून एकरी सात टन उत्पादन मिळते. परंतु केनिंग पाण्याचा वापर केल्याने उत्पादनात भरघोस वाढ होऊन, तब्बल 13 टनाचे उत्पादन मिळाल्याचे प्रयोगशील शेतकरी विजय यांनी सांगितले. वेगवेगळ्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केलास शेतीची उत्पादन क्षमता हमखास वाढेल, असा आत्मविश्वासी त्यांनी व्यक्त केला.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/कृषी/
जपानी तंत्रज्ञानाचा दोडका शेतीसाठी वापर, शेतकऱ्याला झाला फायदा, एकरी मिळवलं तब्बल 13 टन उत्पादन