TRENDING:

Pune Weather: वादळी वारे वाहणार, पाऊस कोसळणार, पश्चिम महाराष्ट्रासाठी 24 तास धोक्याचे

Last Updated:
राज्यात पावसाचा जोर चांगलाच वाढला असून मागील 24 तासात 13 जिल्ह्यातील 166 मंडळात अतिवृष्टी झाली आहे. आज मंगळवार 16 सप्टेंबर रोजी पश्चिम महाराष्ट्रासह राज्यात वादळी वारे, विजांसह जोरदार पावसाची शक्यता आहे.
advertisement
1/7
वादळी वारे वाहणार, पाऊस कोसळणार, पश्चिम महाराष्ट्रासाठी 24 तास धोक्याचे
राज्यात पावसाचा जोर चांगलाच वाढला असून मागील 24 तासात 13 जिल्ह्यातील 166 मंडळात अतिवृष्टी झाली आहे. आज मंगळवार 16 सप्टेंबर रोजी पश्चिम महाराष्ट्रासह राज्यात वादळी वारे, विजांसह जोरदार पावसाची शक्यता आहे.
advertisement
2/7
रायगड आणि पुण्याच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज असल्याने दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यात अनेक ठिकाणी सतर्कतेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
advertisement
3/7
पुण्यातील उरूळीकांचन सर्वाधिक 142 मिमी पावसाची नोंद झाली. पुण्यातील केशवनगर, हवेली, कोथरुड, मुळशी, पौड, खेड, राजगुरुनगर, शिरुर, घोडनंदी, बारामती, इंदापूर, दौंड या तालुक्यांतील बहुतांश मंडळात अतिवृष्टी झाली. यावेळी कमाल तापमान 25.7 अंश सेल्सिअसवर राहिले. आज पुणे जिल्ह्यास जोरदार वादळी पावसाचा यलो अलर्ट तसेच पुणे घाटमाथ्यास जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट आयएमडीने दिला आहे.
advertisement
4/7
कोल्हापूर जिल्ह्यात मागील 24 तासात 0.1 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. आज कोल्हापूर जिल्ह्यात एक-दोन वेळा गडगडाटी पावसाची शक्यता आहे. कोल्हापूरसह कोल्हापूर घाटमाथ्यावर पावसाचा जोर कमी राहणार आहे. मागील 24 तासात सांगली जिल्ह्यामध्ये पावसाची उघडीप राहिली. तसेच 29 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. पुढील 24 तासात विजांसह पावसाची शक्यता आहे. यावेळी जिल्ह्यातील कमाल तापमान 29 तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअस इतके राहील. जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता असल्याने यलो अलर्ट हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
advertisement
5/7
मागील 24 तासात सातारा जिल्ह्यात अतिवृष्टीची नोंद झाली. साताऱ्यातील खटाव, वडूज, पुसेगाव, फलटण, खंडाळा तालुक्यातील वाठार, लोणंद मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. आज साताऱ्यातील कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस राहील. आज सातारा घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता असल्याने यलो अलर्ट देण्यात आला आहे. पावसाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या सोलापूर जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून जोरदार पाऊस कोसळत आहे.
advertisement
6/7
मागील 24 तासात सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीची नोंद झाली. बोरमनी, मुटसी, बार्शी, वैराग, गौडगांव, मैंदर्गी, सावळेश्वर, मोहोळ, माढा, कुर्डुवाडी, रोपळे, महिसगाव, रांजणी, कर्माळा ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली. आज देखील सोलापूर जिल्ह्यात विजांसह वादळी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा यलो अलर्ट आयएमडीने दिला आहे.
advertisement
7/7
राज्यात पावसाचे वातावरण कायम आहे. संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात पुढील 48 तास जोरदार पावसाची शक्यता असल्याने नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याची सूचना हवामान विभागाने दिली आहे. वादळी पावसाला पोषक हवामान असल्याने राज्यातील बहुतांश ठिकाणी विजांसह वादळी पाऊस कोसळू शकतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Pune Weather: वादळी वारे वाहणार, पाऊस कोसळणार, पश्चिम महाराष्ट्रासाठी 24 तास धोक्याचे
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल