TRENDING:

हसू का रडू काय समजेना! Bigg Boss Marathi 6 मध्ये सागरचा नवा ड्रामा, पाहूनच प्रेक्षक चाट पडले

Last Updated:
Bigg Boss Marathi 6 Sagar Karande : बिग बॉस मराठी 6 च्या नव्या एपिसोडच्या प्रोमोमध्ये सागरचा ड्रामा पाहून प्रेक्षकांनी त्याला पुन्हा ट्रोल केलं आहे.
advertisement
1/7
हसू का रडू काय समजेना! Bigg Boss Marathi 6 मध्ये सागरचा नवा ड्रामा, पाहूनच प्रेक्षक चाट पडले
कॉमेडी शोमधून सगळ्यांना खळखळून हसवणणार सागर कारंडे बिग बॉस मराठी 6 च्या घरात येताच मात्र खूपच ट्रोल होऊ लागला आहे. प्रेक्षक सातत्याने त्याच्याबाबत नाराजी व्यक्त करतात, त्याच्याबाबत खूप काय काय बोलतात.
advertisement
2/7
सागर कारंडेचा बिग बॉसच्या घरातील नवा प्रोमो आला आहे, ज्यामुळे तो आता पुन्हा ट्रोल होऊ लागला आहे. सागर कारंडेचा असा ड्रामा पाहायला मिळाला आहे, ज्यावर प्रेक्षकांनी नाटक करू नको, हसू का रडू काय समजेना अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.
advertisement
3/7
बिग बॉस मराठीच्या घरात नवीन पाहुणे आले आहेत. या पाहुण्यांशी घरातील सदस्य संवाद साधत आहेत. काही लोक पाहुण्यांच्या माध्यमातून कुणाला टोमणा मारत आहेत, तर काही जण आपल्या मनातील भावना या पाहुण्यांसमोर व्यक्त करून आपलं मन मोकळं करत आहे.
advertisement
4/7
सागर कारंडेही या पाहुण्यांसमोर आपलं मन मोकळं करताना दिसला. गेले काही दिवस त्याचे प्रभूसोबत वाद होत आहेत, त्यांच्या नात्यात फूट पडली आहे आणि याचीच खं कुठेतरी सागरच्या मनात आहे. घरात पाहुणे आल्यावर सागरने आपली ही खंत बोलून दाखवली.
advertisement
5/7
प्रोमोत पाहू शकता सागर आणि प्रभू एकत्र उभे आहेत. सागरच्या हातात मांजर आहे, जो घरातील पाहुणा आहे. सागर यांचं नाव प्रभू आहे, असं सांगून प्रभूची त्याच्याशी ओळख करतो देतो.
advertisement
6/7
पुढे तो म्हणतो, "आमची मैत्री इतकी झाली. पण त्याने माझ्यावर मैत्री तोडली. मी रोज शोधण्याचा प्रयत्न करतो की, का ही दरी निर्माण झाली. ज्या पद्धतीने मला बोलतो तो. मग बघत नाही की तो माणूस कोण आहे त्याने आपल्यासाठी काय केलंय."
advertisement
7/7
सागरचं बोलणं ऐकल्यावर प्रभूही भावुक होतो. शेवटी तो सागरला मिठी मारताना दिसतो. यावरून सागर आणि प्रभू यांच्यात निर्माण झालेली दरी मिटल्याचं दिसतं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
हसू का रडू काय समजेना! Bigg Boss Marathi 6 मध्ये सागरचा नवा ड्रामा, पाहूनच प्रेक्षक चाट पडले
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल