अर्ध्या एकरात बोरांची लागवड, अडीच लाखाची कमाई, शेतकऱ्याने कशी साधली किमया?
- Published by:Mohan Najan
- Reported by:Patel Irfan Hassan
Last Updated:
अर्ध्या एकरात चेकनेटच्या 60 झाडांच्या माध्यमातून शेतकऱ्याला अडीच लाख ते तीन लाख रुपयांपर्यंत नफा मिळाला आहे.
advertisement
1/7

सध्याच्या घडीला शेतकरी शेतामध्ये नव नवीन प्रयोग करत आहेत. सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यानही असाच एक प्रयोग केला आहे.
advertisement
2/7
उमरान आणि चमेली बोरांच्या झाडातून अधिकाधिक उत्पन्न मिळत नसल्याने शेतकऱ्याने उमराण आणि चमेली या बोरांच्या झाडांना कलम करून अर्ध्या एकरात चेकनेट बोरांची लागवड केली आहे. अर्ध्या एकरात चेकनेटच्या 60 झाडांच्या माध्यमातून शेतकऱ्याला अडीच लाख ते तीन लाख रुपयांपर्यंत नफा मिळाला आहे.
advertisement
3/7
दिगंबर शिवाजी चव्हाण राहणार वाफळे तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर हे आधी उमराण आणि चमेली या बोरांच्या झाडांची लागवड करत होते. मात्र उमराण आणि चमेली या बोरांच्या विक्रीतून खर्चही निघत नव्हता. त्यानंतर शेतकरी दिगंबर यांनी उमराण आणि चमेली या बोरांच्या झाडांना कलम करून चेकनेट बोरांची लागवड केली आहे.
advertisement
4/7
अर्धा एकरात 18 बाय 18 वर दिगंबर चव्हाण यांनी या 60 चेकनेट बोरांच्या झाडांची लागवड केली आहे. चेकनेट बोरांच्या झाडांच्या लागवडी पासून ते फवारणी पर्यंत चव्हाण यांना 40 हजार रुपये पर्यंत खर्च आला आहे.
advertisement
5/7
तर चेकनेट बोरांच्या विक्रीतून सर्व खर्च वजा करुन शेतकरी दिगंबर शिवाजी चव्हाण यांना अडीच लाख ते तीन लाख रुपयांपर्यंत नफा मिळाला आहे. बाजारात चेकनेट बोरांना भाव 70 रुपयांपासून ते 110 रुपये किलो पर्यंत आहे.
advertisement
6/7
चेकनेट बोर रंगाने हिरवट, चवीला गोड आणि बाजारात मागणी देखील चांगली आहे. सोलापूर जिल्ह्यासह कोल्हापूर, पुणे, मुंबई ठिकाणी चेकनेट बोर विक्रीसाठी पाठवले जातात.
advertisement
7/7
चेकनेट बोरे नारिंगी- पिवळसर रंगाची, स्वादिष्ट, गोड आणि आकारालाही चांगली असतात. शेतकऱ्यांनी नक्कीच चेकनेट बोरांची शेती केली तर कमी खर्चात जास्त नफा मिळेल, असं मत दिगंबर शिवाजी चव्हाण यांनी व्यक्त केलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/कृषी/
अर्ध्या एकरात बोरांची लागवड, अडीच लाखाची कमाई, शेतकऱ्याने कशी साधली किमया?