TRENDING:

दुहेरी उत्पन्नाचं साधन भारीच, 6 महिन्यात 3 लाख फायदा, शेतकऱ्यानं असं काय केलं?

Last Updated:
नान्नज्या हाजी बशीर अहमद शेख या शेतकऱ्यानं पाण्यासाठी शेततळं बांधलं. त्यातच मत्स्यशेती करून आता ते दुहेरी उत्पन्न घेत आहेत.
advertisement
1/7
दुहेरी उत्पन्नाचं साधन भारीच, 6 महिन्यात 3 लाख फायदा, शेतकऱ्यानं असं काय केलं?
सध्याच्या काळात शेतीसाठी जोडधंदा करण्याला प्राधान्य देतात. पशुपालन, कुक्कुटपालन असे व्यवसाय बहुतांश शेतकरी करतात. परंतु, सोलापूरच्या एका शेतकऱ्याने मत्स्यपालन सुरू केलेय.
advertisement
2/7
नान्नज्या हाजी बशीर अहमद शेख या शेतकऱ्यानं पाण्यासाठी शेततळं बांधलं. त्यातच मत्स्यशेती करून आता ते दुहेरी उत्पन्न घेत आहेत. विशेष म्हणजे शेतीसाठी पाणी पुरवतानाच मत्स्यशेतीतून देखील लाखोंची कमाई होतेय.
advertisement
3/7
उत्तर सोलापूर तालुक्यातील नान्नज येथील हाजी बशीर अहमद शेख हे एक फार्मासिस्ट आहेत. नान्नज येथेच त्यांची थोडी शेती आहे.
advertisement
4/7
त्यातील अर्ध्या गुंठ्यात त्यांनी शेततळं बनवून मत्स्यपालन व्यवसाय सुरू केला आहे. यासाठी त्यांना 4 लाख रुपयापर्यंत खर्च आला आहे. या मत्स्यपालन व्यवसायातून ते सहा महिन्याला 2 ते 3 लाख रुपयापर्यंतची कमाई करत आहेत.
advertisement
5/7
शेख यांना शेततळे तयार करण्यासाठी 3 ते 4 लाख रुपयेपर्यंत खर्च आला. यातील 80 हजार रुपयांचं अनुदान देखील त्यांना शासनाकडून मिळालं आहे. याच शेततळ्यात त्यांनी मत्स्यशेतीला सुरुवात केली. त्यासाठी त्यांनी माशांची चिलापी ही जात निवडली आहे. चिलापी जातीच्या माशांना एकावेळी 100 हून अधिक पिल्ले होतात. त्यामुळे उत्पन्न चांगले मिळते, असे शेख सांगतात.
advertisement
6/7
चिलापी या माशाला एकदा तळ्यात सोडल्यानंतर त्यापासून उत्पन्न मिळण्यास सुरुवात होते. चिलापी माशांना खाण्यासाठी फिश फूड किंवा तांदूळ शेततळ्यामध्ये टाकले जाते. मत्स्यशेतीसाठी पाणी गरजेचं असतं. दररोज घाण झालेलं पाणी काढून शेतीला दिलं जातं. त्याचा शेतीला फायदा होतो. तर पुन्हा शेततळ्यात पाणी सोडलं जातं, असंही शेख यांनी सांगितलं.
advertisement
7/7
माशांच्या खरेदीसाठी हैद्राबाद, पुणे, येथील व्यापारी शेततळ्याच्या ठिकाणी येतात. मासे पाहून त्याची तिथेच विक्री केली जाते. चिलापी माशाच वजन 200 ते 700 ग्रॅमपर्यंत असते. त्याची विक्री 60 ते 80 रुपये किलोप्रमाणे होत असते. यातून दीड लाख रुपयांपर्यंतचा नफा मिळाला आहे. परंतु, शेतीसोबत हा व्यवसाय दुहेरी उत्पन्नाचे साधन ठरत आहे, असे शेख सांगतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/कृषी/
दुहेरी उत्पन्नाचं साधन भारीच, 6 महिन्यात 3 लाख फायदा, शेतकऱ्यानं असं काय केलं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल