लोकांनी चेष्टा केली, गरीबी सोसली! २ नोव्हेंबरपासून मालव्य राजयोग, 'या' राशींकडे येणार श्रीमंती
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Astrology News : नोव्हेंबर 2025 महिना अनेक शुभ बदल घेऊन येत आहे. नवीन महिन्याच्या सुरुवातीला ग्रहस्थितीत होणारे बदल काही राशींसाठी भाग्यवर्धक ठरणार आहेत.
advertisement
1/5

नोव्हेंबर 2025 महिना अनेक शुभ बदल घेऊन येत आहे. नवीन महिन्याच्या सुरुवातीला ग्रहस्थितीत होणारे बदल काही राशींसाठी भाग्यवर्धक ठरणार आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार या महिन्याच्या प्रारंभी शुक्र ग्रह (Venus) आपली राशी बदलणार असून हे संक्रमण अत्यंत शुभ मानले जात आहे. 2 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 1:21 वाजता शुक्र तूळ राशीत प्रवेश करेल. तूळ ही शुक्राची स्वतःची राशी असल्याने या काळात शुभ शकुन आणि संपत्ती, सौंदर्य व समृद्धीशी संबंधित मालव्य राजयोग निर्माण होईल. या योगाचा थेट लाभ काही राशींना मिळेल.
advertisement
2/5
शुक्र हा प्रेम, कला, ऐश्वर्य, सुखसोयी आणि समृद्धीचा ग्रह मानला जातो. जेव्हा तो स्वतःच्या राशीत म्हणजे तूळ राशीत प्रवेश करतो, तेव्हा त्याचा प्रभाव अत्यंत शक्तिशाली आणि सकारात्मक असतो. या काळात लोकांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य, सर्जनशीलतेत वाढ आणि नातेसंबंधांमध्ये आनंद येण्याची शक्यता असते.
advertisement
3/5
कन्या - कन्या राशीच्या लोकांसाठी हा काळ अत्यंत लाभदायक ठरेल. नोकरी आणि व्यवसायात प्रगतीच्या संधी वाढतील. तुमच्या मेहनतीची दखल वरिष्ठ घेतील आणि पदोन्नतीची शक्यता निर्माण होईल. व्यवसाय करणाऱ्यांना अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतो. नवीन गुंतवणुकीसाठी हा काळ योग्य ठरेल. घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल आणि मुलांकडून सुखद बातम्या मिळतील. या काळात आत्मविश्वास वाढेल आणि तुमच्या निर्णयक्षमतेत स्पष्टता येईल.
advertisement
4/5
तूळ - शुक्राच्या राशीबदलाचा सर्वाधिक सकारात्मक परिणाम तुळ राशीवर दिसेल. कारण शुक्र हा तुळ राशीचा अधिपती ग्रह आहे. लग्न, प्रेमसंबंध किंवा वैवाहिक जीवनात अडथळे दूर होतील. व्यक्तिमत्वात आकर्षकता वाढेल, ज्यामुळे सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रात तुम्हाला नवीन ओळखी मिळतील. परदेश प्रवासाची किंवा नवीन प्रकल्पाची संधी येऊ शकते. नोकरीत पदोन्नती किंवा इच्छित बदलीची शक्यता आहे. घरी शुभ कार्य किंवा धार्मिक कार्यक्रम आयोजित होऊ शकतो.
advertisement
5/5
मीन - मीन राशीच्या लोकांसाठी हा काळ आनंददायी ठरेल. प्रिय व्यक्तीकडून महागडी भेट मिळू शकते किंवा वैवाहिक जीवनात नवीन टप्पा सुरू होऊ शकतो. वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित लाभ होण्याची शक्यता आहे. नवीन व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्यांना ग्रहांचा साथ लाभेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचा सन्मान आणि पगारवाढीची शक्यता निर्माण होईल. आरोग्य सुधारेल आणि मानसिक समाधान मिळेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
लोकांनी चेष्टा केली, गरीबी सोसली! २ नोव्हेंबरपासून मालव्य राजयोग, 'या' राशींकडे येणार श्रीमंती