अरे देवा! आज 10 डिसेंबरपासून या राशींवर येणार आर्थिक संकट, प्रचंड नुकसान होणार
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Astrology News : आयुष्य कधी कोणते वळण घेईल, हे सांगता येत नाही. कधी अचानक नशिबाची साथ मिळते, तर कधी अनपेक्षित अडचणी समोर उभ्या राहतात.
advertisement
1/6

आयुष्य कधी कोणते वळण घेईल, हे सांगता येत नाही. कधी अचानक नशिबाची साथ मिळते, तर कधी अनपेक्षित अडचणी समोर उभ्या राहतात. ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह-नक्षत्रांच्या बदलत्या हालचाली माणसाच्या आयुष्यात मोठे परिणाम घडवतात. विशेषतः आर्थिक बाबींवर ग्रहांची स्थिती थेट प्रभाव टाकते. अशाच एका महत्त्वाच्या ग्रहसंक्रमणामुळे येत्या काही दिवसांत तीन राशींना आर्थिक व मानसिक स्तरावर सावध राहावे लागणार असल्याचा इशारा ज्योतिष तज्ज्ञांनी दिला आहे.
advertisement
2/6
ज्योतिषशास्त्रानुसार, आज 10 डिसेंबर रोजी बुध ग्रह शनीच्या अनुराधा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. बुध ग्रह हा बुद्धी, व्यवहार, संवाद, व्यापार आणि आर्थिक नियोजनाचा प्रतिनिधी मानला जातो. तर शनी हा कष्ट, मर्यादा आणि विलंबाचे संकेत देतो. त्यामुळे बुध शनीच्या नक्षत्रात आल्यामुळे काही राशींसाठी हा काळ आव्हानात्मक ठरू शकतो. १० ते २० डिसेंबर या कालावधीत आर्थिक चणचण, मानसिक ताण आणि कौटुंबिक मतभेद वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
advertisement
3/6
मिथुन राशी - मिथुन राशीसाठी हा काळ संयमाची कसोटी पाहणारा ठरू शकतो. बुध हा या राशीचा स्वामी असल्याने त्याच्या नक्षत्र बदलाचा प्रभाव अधिक जाणवेल. कामाच्या ठिकाणी विरोधक सक्रिय होण्याची शक्यता आहे. कुणावरही अतीविश्वास ठेवणे टाळावे. आर्थिक बाबतीत अनावश्यक खर्च वाढू शकतो, ज्याचा परिणाम पुढील काळात अडचणीच्या स्वरूपात दिसू शकतो. गुंतवणूक करताना घाईचे निर्णय टाळावेत. या काळात शांत राहणे आणि व्यवहारात स्पष्टता ठेवणे फायद्याचे ठरेल. उपाय म्हणून भगवान गणेशाची पूजा केल्यास मानसिक स्थैर्य लाभू शकते.
advertisement
4/6
कर्क राशी - कर्क राशीच्या लोकांसाठी हा काळ अपेक्षाभंगाचा ठरू शकतो. आधी ठरलेली कामे मार्गी लागण्यात अडथळे येऊ शकतात. काही जणांच्या नोकरीत अनिश्चिततेची स्थिती निर्माण होऊ शकते, तर काहींना आर्थिक स्त्रोत कमी झाल्याचा अनुभव येऊ शकतो. यामुळे मानसिक तणाव वाढण्याची शक्यता आहे. घरगुती आणि सामाजिक वादांपासून दूर राहणे हितावह ठरेल. आरोग्याकडे दुर्लक्ष न करता दिनचर्या सुधारण्याची गरज आहे. उपाय म्हणून गायीला हिरवा चारा खायला दिल्यास सकारात्मक ऊर्जा मिळू शकते, असे मानले जाते.
advertisement
5/6
मीन राशी - मीन राशीच्या व्यक्तींना या कालावधीत कौटुंबिक आणि आर्थिक पातळीवर सजग राहावे लागेल. घरातील सदस्यांसोबत गैरसमज होण्याची शक्यता असून बोलताना शब्दांची काळजी घेणे आवश्यक आहे. कोणतीही मोठी आर्थिक गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. अचानक खर्च वाढू शकतो, त्यामुळे बचतीकडे विशेष लक्ष द्यावे. आरोग्याच्या बाबतीतही हलगर्जीपणा नको. नियमित तपासणी आणि जीवनशैलीतील बदल फायदेशीर ठरतील.
advertisement
6/6
<strong>(सदर बातमी फक्त माहितीकरिता असून न्यूज 18 मराठी कुठलाही दावा करत नाही) </strong>
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
अरे देवा! आज 10 डिसेंबरपासून या राशींवर येणार आर्थिक संकट, प्रचंड नुकसान होणार