टीम इंडियामध्ये सूर्या-गिलची रिप्लेसमेंट तयार, एक मुंबईत तर दुसरा डगआऊटमध्ये!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाचा 51 रननी लाजिरवाणा पराभव झाला आहे. 214 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा 162 रनवर ऑलआऊट झाला आहे.
advertisement
1/7

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाच्या बॅटिंगने घोर निराशा केली आहे. याआधी पहिल्या सामन्यातही भारताची बॅटिंग गडगडली होती, पण हार्दिक पांड्याच्या वादळी खेळीने टीम इंडियाला वाचवलं.
advertisement
2/7
फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपआधी टीम इंडिया आता फक्त 8 मॅच खेळणार आहे. वर्ल्ड कप तोंडावर आलेला असताना सुरू असलेली ही कामगिरी टीम इंडियाची चिंता वाढवणारी आहे.
advertisement
3/7
टीम इंडियाचा कर्णधार आणि उपकर्णधार मागच्या बऱ्याच काळापासून सपशेल अपयशी ठरत आहेत. कर्णधार सूर्यकुमार यादव याला मागच्या 24 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये फक्त एक अर्धशतक करता आलं आहे. तर शुभमन गिलने मागच्या 17 आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात एकही अर्धशतक केलेलं नाही.
advertisement
4/7
दुसऱ्या टी-20 सामन्यात शुभमन गिल पहिल्याच बॉलला शून्य रनवर आऊट झाला, तर सूर्यकुमार यादव 5 रनवर पॅव्हेलियनमध्ये परतला. या कामगिरीनंतर सूर्यकुमार यादव आणि गिलला टीममधून बाहेर करण्याची मागणी चाहत्यांकडून केली जात आहे.
advertisement
5/7
सूर्यकुमार यादव आणि शुभमन गिल या दोन्ही खेळाडूंना टीमबाहेर करण्याचा निर्णय निवड समितीने घेतला, तरी या दोन्ही खेळाडूंसाठीची रिप्लेसमेंट टीम इंडियाकडे तयार आहे.
advertisement
6/7
शुभमन गिलचं टी-20 टीममध्ये कमबॅक झालं तेव्हा त्याने संजू सॅमसनची ओपनिंगची जागा घेतली. गिल टीममध्ये आल्यामुळे संजूला मिडल ऑर्डरला बॅटिंग करावी लागली, पण यश न आल्यामुळे संजूला टीमबाहेर करण्यात आलं. गिल रन काढताना संघर्ष करत असेल तर संजूला पुन्हा ओपनिंगची संधी मिळू शकते.
advertisement
7/7
दुसरीकडे सूर्यकुमार यादवला टीमबाहेर करायचं असेल तर मुंबईकर यशस्वी जयस्वालही तयार आहे. जयस्वालने आयपीएलमध्ये राजस्थानकडून खेळताना धमाकेदार कामगिरी केली आहे, त्यामुळे सूर्यकुमार यादवच्या बदली जयस्वालला संधी द्यायचा विचार निवड समितीने करावा, अशी मागणी चाहत्यांनी केली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
टीम इंडियामध्ये सूर्या-गिलची रिप्लेसमेंट तयार, एक मुंबईत तर दुसरा डगआऊटमध्ये!