IND vs SA : टॉस दरम्यान भारताचा पराभव ठरला होता, रवि शास्त्रींनी सामन्याच्या शेवटी सांगितलं मोठं कारण
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
न्यू चंदीगडच्या मुल्लानपूर स्टेडिअमवर साऊथ आफ्रिकेने दिलेल्या 213 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारत 162 धावांवर ऑलआऊट झाली आहे. त्यामुळे साऊथ आफ्रिकेने हा सामना 51 धावांनी जिंकला आहे.
advertisement
1/7

2/7
साऊथ आफ्रिकेने दिलेल्या 213 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताच टॉप ऑर्डर सपशेल ठरल होतं. तिलक वर्माची 62 धावांची अर्धशतकीय खेळी वगळता कुणालाच मोठ्या धावा करता आल्या नाही.
advertisement
3/7
साऊथ आफ्रिकने भारताला 162 धावांवर ऑलआऊट केले. साऊथ आफ्रिकेकडून ओटनल बार्टमनने सर्वाधिक 4 तर लुंगी एनगिडी, मार्का जान्सन आणि लुथो सिपामालाने प्रत्येकी 2 विकेट काढल्या आहेत.
advertisement
4/7
साऊथ आफ्रिकेच्या क्विंटन डिकॉकने सर्वाधिक 90 धावांची खेळी केली होती. त्याच्यासोबत डोनोवन फरेराने 30 धावांची खेळी केली.या बळावर साऊथ आफ्रिकेने 4 विकेट गमावून 213 धावा केल्या होत्या.
advertisement
5/7
भारताकडून वरूण चक्रवर्तीने 2 तर अक्षर पटेलने एक विकेट काढली होती. तर अर्शदिप सिंह, हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराहला एकही विकेट मिळाली नव्हती.
advertisement
6/7
या पराभवानंतर साऊथ आफ्रिकेने पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत भारतासोबत 1-1ने बरोबरी साधली आहे. दरम्यान रवी शास्त्रींनी दुसऱ्या डावाच्या 19 ओव्हरमध्ये भारताचा पराभव का झाला? याचे कारण सांगितले आहे.
advertisement
7/7
खरं तर दोन्ही टीमला टॉस जिंकून बॉलिंग करायची होती. पण दोघांचा निर्णय चुकला, टी20मध्ये तुम्ही बॅटिंग करुन धावसंख्या उभारल्यानंतर त्याचा पाठलाग करणे शक्य होत नाही,असे रवि शास्त्री यांनी म्हटले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs SA : टॉस दरम्यान भारताचा पराभव ठरला होता, रवि शास्त्रींनी सामन्याच्या शेवटी सांगितलं मोठं कारण