दिवाळीपासून घर, बंगला, गाडी,दागिने! ४ राशींच्या नशिबी सगळं येणार, महालक्ष्मी राजयोग प्रभाव पाडणार
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Astrology News : दिवाळी जवळ येत असताना, ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने या वर्षीचा सण अत्यंत शुभ मानला जात आहे. ग्रहांच्या हालचालींमुळे यंदा ‘महालक्ष्मी राजयोग’ निर्माण होत आहे.
advertisement
1/6

दिवाळी जवळ येत असताना, ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने या वर्षीचा सण अत्यंत शुभ मानला जात आहे. ग्रहांच्या हालचालींमुळे यंदा ‘महालक्ष्मी राजयोग’ निर्माण होत आहे, जो धन, यश आणि समृद्धी देणारा मानला जातो. या शक्तिशाली योगामुळे काही राशींवर विशेष कृपा होणार असून त्यांचे भाग्य अक्षरशः उजळून निघेल.
advertisement
2/6
ज्योतिषांच्या मते, २१ ऑक्टोबर २०२५ रोजी चंद्र तूळ राशीत प्रवेश करेल, तर मंगळ आधीपासूनच १३ सप्टेंबरपासून तूळ राशीत भ्रमण करत आहे. २७ ऑक्टोबर रोजी मंगळ पुढे जातो तोपर्यंत चंद्र आणि मंगळ एकत्र राहणार आहेत. या काळात निर्माण होणारी त्यांची युती महालक्ष्मी राजयोग निर्माण करेल. हा योग धनलाभ, प्रतिष्ठा, व्यावसायिक प्रगती आणि कौटुंबिक सुख देणारा मानला जातो.
advertisement
3/6
मेष - महालक्ष्मी राजयोगामुळे मेष राशीच्या लोकांना नवीन गुंतवणुकीचे आणि व्यावसायिक विस्ताराचे मार्ग खुल्या होतील. जुने अडथळे दूर होतील आणि कामांमध्ये गती येईल. नोकरी करणाऱ्यांना पगारवाढ किंवा पदोन्नतीची संधी मिळू शकते. कुटुंबात आनंद आणि एकोप्याचे वातावरण राहील. या काळात घेतलेले आर्थिक निर्णय भविष्यात लाभदायक ठरतील.
advertisement
4/6
कर्क - कर्क राशीच्या लोकांसाठी हा काळ अत्यंत शुभ आहे. विलंब झालेल्या योजना पूर्ण होतील आणि उत्पन्नाचे नवे मार्ग खुलतील. घरगुती सुखसोयी वाढतील. काहीजणांना नवीन घर, वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्याची संधी मिळू शकते. आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि मनात आत्मविश्वास वाढेल.
advertisement
5/6
मकर - मकर राशीच्या व्यक्तींना करिअरमध्ये मोठी झेप घेण्याची संधी मिळेल. वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सहकार्य लाभेल आणि तुमच्या कार्यक्षमतेची दखल घेतली जाईल. काहींना पदोन्नती किंवा नेतृत्वाची जबाबदारी मिळू शकते. आर्थिकदृष्ट्या हा काळ उत्तम राहील. घरात शुभकार्याचे वातावरण निर्माण होईल.
advertisement
6/6
मीन - चंद्र-मंगळ युतीमुळे मीन राशीच्या लोकांच्या आयुष्यात स्थैर्य येईल. आर्थिक व्यवहारांमध्ये नफा मिळेल आणि दीर्घकाळ प्रलंबित प्रकल्प पूर्ण होतील. वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल, तसेच नव्या संधींचे दरवाजे खुलतील. मानसिक शांतता आणि आत्मविश्वास वाढेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
दिवाळीपासून घर, बंगला, गाडी,दागिने! ४ राशींच्या नशिबी सगळं येणार, महालक्ष्मी राजयोग प्रभाव पाडणार