Metro Train : मेट्रोत झोपण्यास मनाई! झोपलात तर भरावा लागेल हजारोंचा दंड, पण का?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Sleeping In Metro Train : रेल्वेप्रमाणेच किती तरी लोक दररोज मेट्रोने प्रवास करतात आणि प्रवास म्हटलं की थोडी झोप आलीच. पण मेट्रो प्रवासातील ही झोप महागात पडू शकते.
advertisement
1/5

गाडीने प्रवास म्हटलं की डुलकी किंवा झोप आलीच. ऑफिससाठी दररोज प्रवास करणारे कितीतरी प्रवासी प्रवासात झोपतात. पण मेट्रोमध्ये अशी झोप काढणं तुम्हाला महागात पडू शकतं.
advertisement
2/5
एक अशी मेट्रो ज्यात तुम्हाला झोपण्यास मनाई आहे. चुकूनही तुम्ही झोपलात तर तुम्हाला दंड बसू शकतो. थोडाथोडका नव्हे तर हजारो रुपयांचा.
advertisement
3/5
मेट्रोमध्ये प्रवास करताना जमिनीवर बसणं, आडवं होणं, गेटसमोर उभं राहणं किंवा बसणं, सीटवर पाय वर करून बसणं, सीट झोपणं यास सक्त मनाई आहे.
advertisement
4/5
हा नियम दुबई मेट्रोचा आहे. अलिकडेच व्हायरल झालेल्या एका प्रवाशाच्या पोस्टनंतर, दुबई मेट्रोचे हे नियम पुन्हा चर्चेत आले आहेत.
advertisement
5/5
दुबई मेट्रोच्या नियमांनुसार, प्रवास करताना जर तुम्ही जमिनीवर बसलात किंवा झोपलात तर तुम्हाला 100 ते 300 दिरहमपर्यंत दंड होऊ शकतो. भारतीय रुपयात ही रक्कम सुमारे 2,500 ते 7500 रुपये आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Metro Train : मेट्रोत झोपण्यास मनाई! झोपलात तर भरावा लागेल हजारोंचा दंड, पण का?